शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पश्चिम विदर्भातील साडे सात लाख हेक्टरमधील रब्बी ‘रामभरोसे’, शेतकऱ्यांची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 11:58 IST

अपुऱ्या पावसाळ्यामुळे जमिनीत आर्द्रतेचा अभाव

गजानन मोहोड

अमरावती : मान्सूनच्या आगमनाला तीन आठवडे झालेला विलंब आणि ऑगस्टमधील पावसाच्या खंडाने पश्चिम विदर्भ यवतमाळ वगळता सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने रब्बी हंगामातील पेरणी कशी करावी, हा प्रश्न उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत रब्बीचे ७.४६ लाख हेक्टर क्षेत्र रामभरोसेच राहणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

महिनाभरापासून रब्बीचा हंगाम सुरु झालेला असताना आतापर्यंत फक्त ३५,२०० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. काही भागात संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने आता पेरणीला सुरुवात होत आहे. मात्र, जमिनीचे पुनर्भरण झालेले नसल्याने भूजल पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी हंगामापर्यंत पुरणार की नाही, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.

पश्चिम विदर्भात यंदाच्या रब्बी हंगामाकरिता ७,४५,८५१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत सद्य स्थितीत फक्त चार टक्केच क्षेत्रात पेरणी झालेली आहे. आता सोयाबीनचा हंगाम शेवटाला आहे. त्यामुळे रब्बीसाठी शेतकरी जमिनीची मशागत करीत आहे. प्रत्यक्षात जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने त्या भागात जिरायती हरभऱ्याची उगवणदेखील पुरेशी होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

रब्बीची जिल्हानिहाय स्थिती

१) अमरावती जिल्ह्यात १,४७,३५० हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सद्यस्थितीत २,८४८ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात १,६०,४०२ (४७६०), अकोला १,२१,१०४ (१०,२९०), वाशिम ८९,७८२ (४४९७) व बुलडाणा जिल्ह्यात २,२७,२१३ हेक्टरच्या तुलनेत १२,८०५ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे.

२) यंदाच्या रब्बीमध्ये सर्वाधिक ५.२७ लाख हेक्टरमध्ये हरभरा, १.८४ लाख हेक्टरमध्ये गहू, १७,३९१ ज्वारी १४,३२१ मका व ८३४ हेक्टरमध्ये करडईचे क्षेत्र राहण्याची शक्यता आहे.

रब्बीच्या पेरण्या सुरु झालेल्या आहेत. यंदा काही भागातील जमिनीत आर्द्रता कमी आहे. त्यामुळे सरासरी क्षेत्राच्या तुलनेत पेरणीची टक्केवारी थोडी कमी राहण्याची शक्यता आहे.

- किसनराव मुळे, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती