शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

‘क्यूरिंग’च नाही, दर्जा कसला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:27 IST

नियोजनाअभावी दोन महिने प्रलंबित राहिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या 'हायप्रोफाइल' कामात तांत्रिक गुणवत्ता नसल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्देसिमेंट रोड : पाण्याअभावी रस्त्याला नाही का जाणार तडे?

गणेश देशमुख ।आॅनलाईन लोकमतअमरावती : नियोजनाअभावी दोन महिने प्रलंबित राहिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या 'हायप्रोफाइल' कामात तांत्रिक गुणवत्ता नसल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. रस्त्याचे ‘क्यूरिंग’च झाले नसल्याने दर्जा खालावला नाही काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.जिल्हा स्टेडियमपासून सिमेंट रस्त्याच्या बांधकामाची सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांना दोन महिन्यांपासून छळणारे हे काम 'लोकमत'च्या दणक्यानंतर सुरू झाले. तथापि, कंत्राटदार कंपनीने करारानुसार आणि तंत्रशुद्ध मापदंडानुसार काम करण्याऐवजी स्वयंसोईने काम करण्याचा जणू चंगच बांधला आहे. सिमेंट रस्त्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या प्रक्रियांपैकी एक असलेल्या 'क्यूरिंग'लाच तिलांजली देण्यात आली आहे.नियमानुसार काँक्रीट अंथरल्यावर, ते टणक झाल्यावर, आठ ते बारा तासांत त्यावर सातत्याने पाण्याचा थर असणे आवश्यक आहे. वाटे पाडणे वा इतर काही कारणाने काही तास पाणी साठवणे शक्य होणार नसले, तर जाड कापड अंथरून ते ओलेच असेल, याची काळजी कंत्राटदाराने घ्यायला हवी. क्यूरिंगसाठीची ती अत्यावश्यक पद्धती आहे. जेपीई कंस्ट्रक्शन कंपनी बांधत असलेल्या रस्त्यावर या महत्त्वपूर्ण नियमाला तिलांजली देण्यात आली आहे. दिवसातून एखादे वेळी पाइपद्वारे रस्त्यावर पाणी टाकले जाते. परंतु पाइप पुढे नेला जात असताना मागचा रस्ता कोरडा पडलेला असतो. रस्त्यांच्या क्यूरिंगबाबत इतकी उदासीनता अवलंबिली जात आहे.‘क्यूरिंग’ म्हणजे कायकाँक्रीटमधील आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊ न देता त्याला विशिष्ट आवश्यक तपमानात ठेवणे या प्रक्रियेला ‘क्यूरिंग’ असे म्हणतात. सिमेंटच्या ग्रेडवर या प्रक्रियेचा कालावधी किती दिवस असावा, हे ठरविले जाते. या प्रक्रियेत तपमान कमी राखणे आवश्यक असल्यामुळे काँक्रीटवर सातत्याने पाण्याचा वापर केला जातो.क्यूरिंगचे असे आहेत लाभतांत्रिकदृष्ट्या अचूक क्यूरिंग केल्यास संबंधित काँक्रीटची मजबुती दखलनीय वाढते. काँक्रीटमधील सच्छिद्रतेचे प्रमाण विशेषत्वाने कमी होते. प्रमाणित पद्धतीने क्यूरिंंग झाल्यास काँक्रीटला जाणारे तडे (क्रॅक्स) आश्चर्यकारकरीत्या कमी होतात. काँक्रीटच्या रस्त्याचे आयुष्य त्यामुळे वाढते.अधिकाऱ्यांना का हे खटकू नयेतंत्रशुद्ध पद्धतीने क्यूरिंग करणे हे कंत्राटदाराचे आणि ते करवून घेणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे कर्तव्य आहे. रस्तानिर्मितीच्या कामात नियोजन नव्हतेच. अधिकाºयांनी ना मार्गदर्शन केले, ना अधिकार वापरले. आता रस्त्याचा आत्मा असलेले ‘क्यूरिंग’ योग्यरीत्या केले जात नसतानादेखील अधिकाºयांचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. करोडो रुपयांची उधळपट्टी कुणी मनमर्जीप्रमाणे करीत असेल आणि तरीही अधिकारी गप्पच राहणार असतील, तर त्यांची नियुक्ती वेतन घेण्यासाठीच का, असा सवाल उपस्थित झाला आहे.'हाय ग्रेड काँक्रीट' आणि 'हीट आॅफ हायड्रेशन'सिमेंट रस्त्यासाठी वापरले जाणारे काँक्रीट हे 'हाय ग्रेड काँक्रीट' असते. त्यामुळे त्यात 'हीट आॅफ हायड्रेशन'चे प्रमाण जास्त असते. अर्थात अशा काँक्रीटमधून ऊर्जा जादा प्रमाणात उत्सर्जित होते. पाण्याची गरज या पद्धतीच्या काँक्रीटला त्यामुळेच अधिक असते. त्यातही पहिले २४ ते ३६ तास अत्यंत नाजूक असतात.