असदपूर, काकड्यात युरियाकरिता रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:01 IST2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:01:07+5:30

असदपूर येथे ज्या ठिकाणी युरिया वितरण सुरू होते, तेथे गावातील एक निवृत्त सैनिक हाती विळा घेत दाखल झाला. तो तेथील गोंधळ बघत असताना तैनात पोलिसाने हटकले. यावर त्याने त्या पोलीस शिपायाकडे तो विळा उलटा केला. पोलीस शिपायाच्या कपाळावर तो विळा लागला. या घटनेच्या अनुषंगाने आसेगाव पोलिसांनी संबंधितास अटक केली असून, त्याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३५३, ३३२, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Queues for urea at Asadpur, Kakad | असदपूर, काकड्यात युरियाकरिता रांगा

असदपूर, काकड्यात युरियाकरिता रांगा

ठळक मुद्देअसदपूरमध्ये गोंधळ : निवृत्त सैनिकाकडून पोलिसाला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील असदपूर व काकड्यात युरियाकरिता शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. यादरम्यान रविवारी असदपूर येथे युरिया वाटपादरम्यान गोंधळ उडाला. कृषी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटप सुरू होते. यात गोंधळ उडत असल्याचे बघून कृषी अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त बोलावला. आसेगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी तेथे तैनात झाले.
अचलपूरला २५ जुलैला २५ मेट्रिक टन युरिया मिळाला होता. यातील साडेबारा मेट्रिक टन युरियाचे असदपूरला, तर साडेबारा मेट्रिक टन युरियाचे काकडा येथे २६ जुलैला वाटपाकरिता पाठविण्यात आले.
दरम्यान, युरियाचा तुटवडा नाही. आजमितीस ४८ मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे. असदपूरला एसटी महामंडळाच्या वाहतूक सेवेने साडेबारा टन युरिया पाठविण्यात आल्याची माहिती अचलपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी अंकुश म्हस्के यांनी दिली.

विळ्याची मूठ लागली; गुन्हा दाखल
असदपूर येथे ज्या ठिकाणी युरिया वितरण सुरू होते, तेथे गावातील एक निवृत्त सैनिक हाती विळा घेत दाखल झाला. तो तेथील गोंधळ बघत असताना तैनात पोलिसाने हटकले. यावर त्याने त्या पोलीस शिपायाकडे तो विळा उलटा केला. पोलीस शिपायाच्या कपाळावर तो विळा लागला. या घटनेच्या अनुषंगाने आसेगाव पोलिसांनी संबंधितास अटक केली असून, त्याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३५३, ३३२, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असदपूरमधील गावंडे फर्टिलायझर या प्रतिष्ठानापुढे ही घटना घडली.

Web Title: Queues for urea at Asadpur, Kakad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.