प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:55 IST2018-05-07T03:55:54+5:302018-05-07T03:55:54+5:30
बी-फार्मची प्रश्नपत्रिका मित्रांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविणाऱ्या परीक्षार्थ्यास गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. प्रज्ज्वल वानखडे (१९) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी प्रज्ज्वल वानखडेसह त्याचे मित्र आशिष फेंडर व सिद्धेश भावे यांनाही आरोपी बनविले आहे.

प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर; एकास अटक
अमरावती : बी-फार्मची प्रश्नपत्रिका मित्रांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविणाऱ्या परीक्षार्थ्यास गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. प्रज्ज्वल वानखडे (१९) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी प्रज्ज्वल वानखडेसह त्याचे मित्र आशिष फेंडर व सिद्धेश भावे यांनाही आरोपी बनविले आहे.
पोलीस तक्रारीनुसार, मोर्शी मार्गावरील श्री शिवाजी सायन्स कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर शनिवारी बी-फार्मच्या सेकंड सेमिस्टरचा कम्युटर अॅप्लीकेशन इन फार्मा या विषयाचा पेपर होता. सकाळी सर्व परीक्षार्थी परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी केंद्र पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून मोबाइल बाहेरच ठेवण्यास सांगितले. त्यानंतर परीक्षेला सुरुवात झाल्यावर विद्यार्थ्यांनी पेपर सोडविणे सुरू केले. केंद्र पर्यवेक्षक भूषण जळमकर हे विद्यार्थ्यांवर लक्ष देत होते. दरम्यान, प्रज्ज्वल वानखडे हा विद्यार्थी मोबाइलवर काही पाहत असल्याचे जळमकर यांना दिसले. त्यांनी तो मोबाईल हाती घेऊन पाहिले असता प्रज्ज्वलने प्रश्नपत्रिकांचे छायाचित्रे घेऊन ते आशिष व सिद्धेश यांच्या फॉरवर्ड केल्याचे दिसून आले.