वीजबिल वसूलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:17 IST2021-08-28T04:17:17+5:302021-08-28T04:17:17+5:30
अमरावती: थकित वीजबिल वसूलीसाठी महावितरणने कारवाई तीव्र केली असतांनाच गुरुवारी मोहम्मद हसन खान याने व त्याच्या दोन साथीदाराने दुधसागर ...

वीजबिल वसूलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की
अमरावती: थकित वीजबिल वसूलीसाठी महावितरणने कारवाई तीव्र केली असतांनाच गुरुवारी मोहम्मद हसन खान याने व त्याच्या दोन साथीदाराने दुधसागर डेअरीचे ७० हजार रूपयाचे थकित वीजबिल भरण्याचे सोडून कारवाईसाठी गेलेल्या महिला कार्यकारी अभियंता व त्यांच्या टिमला अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्यांच्यावर नागपुरी गेट पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरणकडून जिल्ह्यात थकीत वीजबिल वसूली मोहिमेला गती देण्यात आली आहे. या मोहिमेचाच भाग म्हणून कार्यकारी अभियंता(प्रशासन) प्रतिक्षा शंभरकर यांच्या नेतृत्वात असलेले पथक महावितरण भाजीबाजार केंद्राअंतर्गत वसूलीसाठी गेले असतांना ,दुधसागर डेअरीकडे असलेल्या ७०,००० रूपयाच्या वीजबिलाची थकबाकी भरण्यासंदर्भात विचारले असता, मोहम्मद हसन खान व त्यांचे दोन सहकारी यांनी भरण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करत असतांना मोहमद हसन खान यांनी कार्यकारी अभियंता व त्यांच्या टिमला अश्लील भाषेत शिवीगाळ केली,समजावण्याचा प्रयत्न करणारे सहाय्यक अभियंता बारब्दे व तंत्रज्ञ रविंद्र पांडे यांना धक्काबुक्की करत थापडांनी मारहाण करण्यात आली.दरम्यान या सर्व प्रसंगाचे व्हीडीवो घेणाऱ्या कार्यकारी अभियंताच्या हाताला झटका मारून अज्ञात व्यक्तीकडून त्यांचा मोबाईलही खाली पाडण्यात आला व मारण्याची धमकी देत वीज पुरवठा खंडित करण्यासाठी वापर करण्यात येणारी सीडीही तोडली.
आरोपीविरुद्ध यांच्या विरोधात नागपुरी पोलिस ठाण्यात भादविची ३५३,३३२,२९४,५०६ व सार्वजिनक मालमत्ता नुकसान प्रती कायदा कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.