कोरोनाचे नियम पाळून बाजार समितीत तूर, चना खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST2021-03-05T04:14:02+5:302021-03-05T04:14:02+5:30
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करण्यासाठी यार्डात धान्य खरेदी सुरू करण्याचे आदेश ...

कोरोनाचे नियम पाळून बाजार समितीत तूर, चना खरेदी
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करण्यासाठी यार्डात धान्य खरेदी सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १ मार्च रोजी बाजार समितीला दिले होते. त्याअनुषंगाने गुरुवारी बाजार समितीत धान्य खरेदी पूवर्वत सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी तुरीची विक्रमी आवक नोंदविल्या गेली.
तुरीची ८,१७५ क्विंटल, चना ४,१९८ तर सोयाबीनची दोन हजार क्विंटलची आवक गुरुवारी झाली.
तुरीला प्रती क्विंटलमागे ६६०० रूपयाचा तर चना या शेतमालाला ४९०० रुपयाचा प्रती क्विंटल भाव मिळाल्याचे सचिव दीपक विजयकर यांनी सांगितले. बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून बाजार समितीत शेतमालाची खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, म्हणून बाजार समितीचे कामकाज सुरु करण्याचे विनंती जिल्हाधिकारी यांना पदाधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आली होती. तुरीच्या खरेदीच्यावेळी बाजार समितीचे उपसभापती नाना नागमोते, तालुका उपनिबंधक राजेंद्र भुयार, सहकार अधिकारी पारिसे, चंद्रशेखर पुरी, बाजार समितीचे सचिव दिपक विजयकर, सहायक सचिव बी. एल डोईफोडे उपस्थित होते. यावेळी मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.