शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

थर्मल स्क्रि निंग, पल्स आॅक्सिमीटरची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 5:00 AM

शासनाने सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे विस्कळीत झालेली परिस्थिती टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती वाढविली आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सोबतच ग्रामीण भागातील नागरिकही कामानिमित्त झेडपीत येत असल्याने वर्दळ वाढली आहे. यामध्ये कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबतच अभ्यागतांसाठी प्रवेशव्दाराजवळ हॅण्डवॉशची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

ठळक मुद्देखबरदारी : झेडपीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेत २६ थर्मल स्क्रिनिंग गण, तर ३० पल्स ऑक्सिमीटरची खरेदी केली जाणार आहे. सध्या २६ थर्मल स्क्रिनिंग गण उपलब्ध झाल्या असून पल्स ऑक्सिमीटरसाठी पाठपुरावा सुरू आहे.शासनाने सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे विस्कळीत झालेली परिस्थिती टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती वाढविली आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सोबतच ग्रामीण भागातील नागरिकही कामानिमित्त झेडपीत येत असल्याने वर्दळ वाढली आहे. यामध्ये कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबतच अभ्यागतांसाठी प्रवेशव्दाराजवळ हॅण्डवॉशची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत, पंचायत समितीच्या कार्यालयात व पदाधिकाऱ्यांकडे येणाऱ्यांची वर्दळ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी वरील ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकांचे थर्मल स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटरव्दारे तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासनाने २६ थर्मल स्क्रिनिंग गणची खरेदी केली आहे, तर पल्स ऑक्सिमीटरची मागणी करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसह कर्मचाºयांची थर्मल स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटरव्दारे तपासणी केली जाणार आहे.लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथिलता आणली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वर्दळ पाहता खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार थर्मल स्क्रिनिंग गण उपलब्ध करून दिले आहेत. पल्स ऑक्सिमीटरची मागणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.- तुकाराम टेकाळे,डेप्युटी सीईओ (सामान्य प्रशासन)

टॅग्स :zpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या