३, ६०० क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:28 IST2020-12-13T04:28:55+5:302020-12-13T04:28:55+5:30

पान २ ची सेकड लिड परतवाडा : अचलपूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने १ डिसेंबरपासून कापूस ...

Purchase of 3,600 quintals of cotton | ३, ६०० क्विंटल कापूस खरेदी

३, ६०० क्विंटल कापूस खरेदी

पान २ ची सेकड लिड

परतवाडा : अचलपूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने १ डिसेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. ११ डिसेंबरपर्यंत ६१० शेतकऱ्यांनी अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी केली. त्यापैकी ११७ शेतकऱ्यांच्या ३ हजार ६०० क्विंटल कापसाचे मोजमाप पणन महासंघाच्या रामसावी इंडस्ट्रीजमध्ये करण्यात आले. पणन महासंघाच्यावतीने कापूस खरेदीसाठी जिल्ह्यात वरूड, मोर्शी, दर्यापूर, अमरावती व अचलपूर अशी पाच केंद्रे उघडण्यात आली आहेत.

गतवर्षी पणन महासंघाच्यावतीने येथील जवळपास पाच जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापूस खरेदी करण्यात आली होती. त्यातील परतवाडा बैतुल मार्गावरील रजत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये करण्यात आलेली खरेदी वादग्रस्त ठरली. तेथे शासकीय ग्रेडर विनोद देशमुख अनेक वर्षांपासून कापसाची प्रतवारी ठरवित होते. त्यांच्या कार्यकाळातच जवळपास पाचशे रुईगाठींची संगनमताने चोरी झाल्याची तक्रार तेथे कार्यरत हमालांनी केली. या वादग्रस्त पार्श्वभूमीवर यंदा अचलपूर तालुक्यात अंजनगाव मार्गावरील रामसावी इंडस्ट्रीजमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ १ डिसेंबरपासून करण्यात आला आहे. त्यासाठी शासकीय ग्रेडर म्हणून व्ही.डी. चारथळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुन्हा शेतकऱ्यांची नाडवणूक?

अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील काही खासगी दलाल वजा व्यापाऱ्यांची चुळबुळ सुरू झाली आहे. शेतकऱ्यांचा कापूस कमी दरात खरेदी करून तो नाफेडला विकण्याचा गोरखधंदा येथे यापूर्वी झाल्याची माहिती असून, तोच प्रकार पुन्हा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोट

अचलपूर येथे रामसावी इंडस्ट्रीज येथे पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा १ डिसेंबरला शुभारंभ झाला. ११ डिसेंबरपर्यंत ३ हजार ६०० किंटल कापूस मोजण्यात आला आहे.

- डी.यू. कांबळे, प्र. विभागीय व्यवस्थापक, पणन महासंघ, अमरावती

----------------------------

Web Title: Purchase of 3,600 quintals of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.