आजपासून ‘पुनर्वसु’ नक्षत्राला सुरवात;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:10+5:302021-07-07T04:15:10+5:30
नक्षत्राचे वाहन उंदीर समाधानकारक पावसाचे योग,पण पावसाळी वातावरणाचा जोर टिकून राहणार नाही. चांदूर बाजार : हवामानाच्या परंपरेनुसार चालत आलेल्या ...

आजपासून ‘पुनर्वसु’ नक्षत्राला सुरवात;
नक्षत्राचे वाहन उंदीर
समाधानकारक पावसाचे योग,पण पावसाळी वातावरणाचा जोर टिकून राहणार नाही.
चांदूर बाजार : हवामानाच्या परंपरेनुसार चालत आलेल्या ठोकताळ्यानुसार पावसाचे पुनर्वसु या चौथ्या नक्षत्राला ६ जुलैला पहाटे ५ वाजून १६ मिनिटांनी सुरुवात झाली आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर असल्यामुळे या नक्षत्राचा पाऊस बेताचाच, पण समाधानकारक असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
नक्षत्राच्या पहिल्या चरणात ९जुलैपर्यंत तुरळक पावसाचे योग आहेत. अमावस्येच्या सुमारास ११ जुलैदरम्यान सार्वत्रिक पाऊस होईल. त्यानंतर चार ते पाच दिवस खंडवृष्टी होईल. १६ जुलै दरम्यान पुन्हा चांगला पाऊस होईल. पावसाळी वातावरणाचा जोर टिकून राहणार नसला तरी बहुतांश भागात खरिपातील पेरण्या पूर्ण होतील. १३ ते २० जुलै दरम्यान पेरणीयोग्य पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.