पोटदुखीच्या औषधात निघाली पाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 21:57 IST2018-06-30T21:56:57+5:302018-06-30T21:57:19+5:30
येथील एका तरुणाचे पोट दुखत असल्याने तो डॉक्टरकडे गेला. तपासणीनंतर त्याला लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन मेडिकल स्टोअरमध्ये गेला. पोटदुखीची औषधी घरी घेऊन आला नि औषध त्याचे सेवन केले. दुसऱ्यांदा औषध घेताना मात्र बाटलीतून पालीचे अवशेष बाहेर पडले. त्याने तत्काळ आसेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

पोटदुखीच्या औषधात निघाली पाल
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पूर्णा : येथील एका तरुणाचे पोट दुखत असल्याने तो डॉक्टरकडे गेला. तपासणीनंतर त्याला लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन मेडिकल स्टोअरमध्ये गेला. पोटदुखीची औषधी घरी घेऊन आला नि औषध त्याचे सेवन केले. दुसऱ्यांदा औषध घेताना मात्र बाटलीतून पालीचे अवशेष बाहेर पडले. त्याने तत्काळ आसेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
प्राप्त माहितीनुसार, मध्यप्रदेशातील घुरावर या गावातील एक कुटुंब दोन वर्षांपूर्वी उपजीविकेकरिता आसेगाव येथे राहायला आले. त्यांचा हातगाडीवर भेळपुरी, पाणीपुरीचा व्यवसाय आहे. सत्येंद्र ऊर्फ सुनील झलकसिंह बघेल (२१) याचे २६ जून रोजी पोटात दुखत असल्याने तो खासगी हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी पोटदुखीवर औषध लिहून दिली. राम दुरतकर यांच्या मेडिकल स्टोअरमधून बॉटल घेऊन तो घरी गेला. रात्री एकदा औषध घेतल्यानंतर दुसºयांदा त्याने ते झाकणात ओतले असता, पालीचे अवशेष दृृष्टीस पडले.
दुसºया दिवशी सुनीलला भाऊ दिनेश बघेल हा स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन गेला. तेथील डॉक्टरांनी अमरावती येथे त्वरित उपचाराकरिता नेण्याचा सल्ला दिला. अमरावती येथील खासगी रुग्णालयात सुनील सध्या उपचार घेत असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नूक्रॉल-ओ हे घट्ट औषध आहे. त्यामुळे ग्राहकाला देताना ही बाब नजरेस पडली नाही. याबाबत कंपनीला कळविले आहे. एमआर आले होते. विचारणा करून रुग्णांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.
- राम दुरतकर, संचालक औषधी केंद्र, आसेगाव पूर्णा