रेल्वे स्थानकासमोर पाण्याचे डबके, प्रवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST2021-06-18T04:09:57+5:302021-06-18T04:09:57+5:30
बड़नेरा : येथील रेल्वे पोलीस व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर पाण्याचे डबके साचले आहे. कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना त्यातूनच जावे ...

रेल्वे स्थानकासमोर पाण्याचे डबके, प्रवासी त्रस्त
बड़नेरा : येथील रेल्वे पोलीस व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर पाण्याचे डबके साचले आहे. कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना त्यातूनच जावे लागते. पहिल्या पावसात पाणी साचले. त्यापासून डासांचा देखील प्रादुर्भाव झालेला आहे. संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी, असे प्रवासी वर्गांमध्ये बोलले जात आहे.
रेल्वे पोलीस स्थानक तसेच रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या एका मार्गावर प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांना साचलेल्या पाण्याच्या डबक्यातून जावे लागते. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पहिल्या पावसात येथे डबके साचले आहे. रेल्वे पोलीस ठाण्यात जाणारे कर्मचारी, तक्रारदार त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या बहुतांश प्रवासी कर्मचाऱ्यांना साचलेल्या पाण्याच्या डबक्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पाण्यापासून डासांची उत्पत्ती होत आहे. आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. संबंधित प्रशासनाने या भागात पाणी साचणार नाही अशा उपाययोजना कराव्यात. थोड्याच पाण्याने डबके साचले आहे, जास्त पाणी आल्यावर प्रवाशांनी या मार्गाने रेल्वे स्थानकाकडे जावे कसे, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.