शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

वने, वन्यजीव, जैवविविधतांच्या संवर्धनासाठी होणार जनजागृती; ३७ कोटी १७ लाखांचा खर्च

By गणेश वासनिक | Updated: February 16, 2024 17:46 IST

Amravati: वने, वन्यजीव, जैवविविधता यांचे संरक्षण, संवर्धन आणि वनक्षेत्र, वन आच्छादन वाढविण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्याकरिता शासनाने प्रचार, प्रसार व प्रशिक्षणावर भर दिला असून, या आर्थिक वर्षात ३७ कोटी १७ लाख ८७ हजार ४४६ रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

- गणेश वासनिकअमरावती - वने, वन्यजीव, जैवविविधता यांचे संरक्षण, संवर्धन आणि वनक्षेत्र, वन आच्छादन वाढविण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्याकरिता शासनाने प्रचार, प्रसार व प्रशिक्षणावर भर दिला असून, या आर्थिक वर्षात ३७ कोटी १७ लाख ८७ हजार ४४६ रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

जागतिक तापमानातील बदल, हवामानातील बदल आणि पर्यावरणीय बदलांमुळे वने, वन्यजीव, जैवविविधता यांचे संरक्षण, संवर्धन, व्यवस्थापन यासंदर्भात जनजागृती करून लोकांचा सहभाग वाढवून विचार मंथन केले जाणार आहे. महसूल व वनविभागाने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी या विषयाला प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान केली आहे. यात प्रिंट आणि इलेक्ट्राॅनिक मीडिया, बस, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीची साधने, सार्वजनिक ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. तसेच चित्रफिती, लहान स्वरूपातील चित्रपट, लेख, भित्तीचित्रे आदींद्वारे जनजागृती केली जाणार आहे. शासनाच्या विविध वेबसाइट, सोशल मीडिया यावर वने आणि पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाची कामे, योजना, निर्णयाची माहिती प्रसारित केली जाणार आहे. सन २०२३-२४ या वर्षात प्रचार, प्रसारासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ही संकल्पना आहे.

या बाबींवर असेल भर- प्रिंट क्रिएटिव्ह निर्मिती व ॲडॅप्टेशन, टीव्हीसी, ऑडिओ जिंगल आणि स्पॉट, लघुपट, माहितीपट आणि यशोगाथा निर्मितीसाठी ५ कोटी ५७ लाख ४० हजारांचा खर्च प्रस्तावित आहे.- वृत्तपत्रांमध्ये जाहिरात, मेट्रो शहरात होर्डिंग्ज, विमानतळावर प्रसिद्धी, नागपूर, पुणे, मुंबई सिटी बस क्यू शेल्टर, लोकल केबल, डिस्प्ले, समाजमाध्यम, आकाशवाणी, खासगी एफ. एम. वाहिन्या, ट्रेन रॅप, पुरस्कार सोहळ्यासाठी १७ कोटी ६८ लाख ६ हजारांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.- वनमंत्री यांची वनविषयक मुुलाखत, दृक-श्राव्य प्रसारण, वन्यजीव आणि वन विभागाशी संबंधित माहितीपट, विमानतळावर कायमचे डिजिटल बोर्ड, डिस्प्ले, डिजिटल ग्रंथालय निर्मिती, वन गीत, ईको क्लब व प्रतिज्ञा, वृक्ष उत्पादन आणि वृक्ष खरेदीदारांचा मेळावा, जागतिक वनदिनानिमित्त विविध आयोजन, प्रशिक्षण, चंद्रपूर व मूल बसस्थानकावर वने व वन्यजीव यासंदर्भात रंगरंगाेटी, फार्म ट्री व कृषी वानकी ॲप, मंत्रालयात थ्रीडी आणि प्रदर्शन, ताडोबा महाेत्सवासाठी १३ कोटी ९२ लाख ४० हजार ६४६ रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवAmravatiअमरावती