एसीबी गणेशोत्सवात लाचखोरीविरुद्ध करणार जनजागृती
By Admin | Updated: August 31, 2014 00:09 IST2014-08-31T00:09:23+5:302014-08-31T00:09:54+5:30
अमरावती विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गणेशोत्सवात लाचखोरीविरुद्ध जनजागृती करणार.

एसीबी गणेशोत्सवात लाचखोरीविरुद्ध करणार जनजागृती
नितीन गव्हाळे/अकोला
शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील लाचखोरी रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)तर्फे अनेक प्रयोग राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या गणेशोत्सवामध्ये या विभागाच्या वतीने अमरावती विभागातील सर्व जिल्हय़ांमध्ये लाचखोरीविरूद्ध मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.
भ्रष्टाचाराच्या विरोधात जनमानसात प्रचंड आक्रोश असूनही, लाच घेणारे व देणार्यांची संख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, सध्या एसीबीने लाचखोरांविरूद्ध धडाक्यात मोहीम सुरू केली आहे. दररोज कुठे ना कुठे लाचखोर जाळय़ात अडकत आहेत. त्यामुळे आता एसीबीच्या अधिकार्यांनी कारवाईसोबतच विविध स्तरावर समाजात जनजागृती करण्याची मोहीम आखली असून, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये लाचखोरी, भ्रष्टाचार या विषयावर पथनाट्याच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावतीचे पोलिस उपअधीक्षक सचिन शिंदे यांच्या देखरेखीखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी मूर्तिजापूरच्या नाट्यपथकाची निवड करण्यात आली आहे. या नाट्यपथकाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरूद्ध जनजागृती करण्यात येणार आहे. सोबतच ऑटोरिक्षांवरील पोस्टर्स, स्टिकर्स आणि पत्रकांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जाईल.
गणेशोत्सव हा जनतेचा उत्सव आहे. यानिमित्ताने हजारो तरूण, तरूणी एकत्र येतात. त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये ह्यभष्ट्राचार थांबवा, देश वाचवाह्ण मिशनतर्गंत एसीबीच्या वतीने अकोला जिल्हय़ात नाट्यपथकाव्दारे जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी पोलिस उपअधीक्षक सचिन शिंदे यांच्या देखरेखीखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून ही जनजागृती होणार असल्याचे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी सांगीतले.
*स्टॉप करप्शन, सेव्ह नेशन
एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी भ्रष्टाचाराविरूद्ध जनजागृतीसाठी ह्यहाय टेकह्ण पद्धतीचा अवलंब केला आहे. फेसबुक, व्हॉट्स अँप यासारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमांचा उपयोग करीत, भष्ट्राचाराविरूद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. लाच घेणार्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचार्यांची छायाचित्रे फेसबुकवर टाकण्यात येत आहेत. ह्यस्टॉप करप्शन, सेव्ह नेशनह्ण या मिशनतर्गंत अमरावती विभाग एसीबीने सुद्धा जनजागृतीसाठी मोहिम हाती घेतली आहे.