अंगणवाडी सेविकांची राजकमल चौकात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:55 IST2017-09-22T23:54:33+5:302017-09-22T23:55:42+5:30
महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाºयांसाठी जाहीर केलेला मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्याने जिल्ह्यातील २४०० हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

अंगणवाडी सेविकांची राजकमल चौकात निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाºयांसाठी जाहीर केलेला मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्याने जिल्ह्यातील २४०० हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. शासनाच्या निषेधार्थ कर्मचाºयांनी शुक्रवारी राजकमल चौकात निदर्शने करून शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले.
विविध मागण्यांबाबत आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी मानधनवाढीचा प्रस्ताव तयार झाला असून आठ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्या मंजूर करून घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यालाही बराच कालावधी लोटून गेला आहे त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संपावर ठाम आहेत.
सन २०११ पासून इंधनासाठी देण्यात येणाºया रकमेमध्येही वाढ झालेली नाही. यामध्ये वाढ व्हावी, अशी मागणीही शासन दरबारी केली. मात्र याचीही दखल घेतली नाही. परिणामी या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी हा संप पुकारल्याचे सांगितले. या मागण्यांवर अद्यापही तोडगा न काढल्याने शासनाविरोधात घोषणाजी करीत राजकमल चौकात अंगणवाडी सेविकांनी निदर्शने करीत शासनाला न्याय देण्याची मागणी केली. जोवर तोडगा निघणार नाही. तो पर्यत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. यावेळीे संघटनेचे अध्यक्ष संजय मापले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. यावेळी रतन गुजर, चंदा नवले, रेखा गुंबळे, शालिनी देशमुख, विमल बोरकुटे, पुष्पा मेश्राम, लता दहातोंडे, मंगला विधळे, मीना शहाने यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.