जांबुवंतराव धोटेंच्या वक्तव्याचा निषेध

By Admin | Updated: July 3, 2014 23:20 IST2014-07-03T23:20:29+5:302014-07-03T23:20:29+5:30

श्री गजानन महाराज साईबाबा, आणि ताजोद्दीन बाबा या संताबद्दल अनादर करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकाराचा स्थानिक श्री गजानन महाराज भक्त सेवा समितीने जाहीर निषेध करून धोटे यांच्यावर

The protest of Jambuwantrao Dhoten's statement | जांबुवंतराव धोटेंच्या वक्तव्याचा निषेध

जांबुवंतराव धोटेंच्या वक्तव्याचा निषेध

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कारवाईची मागणी
अमरावती : श्री गजानन महाराज साईबाबा, आणि ताजोद्दीन बाबा या संताबद्दल अनादर करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकाराचा स्थानिक श्री गजानन महाराज भक्त सेवा समितीने जाहीर निषेध करून धोटे यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली.
विदर्भाची पंढरी असलेल्या श्री गजानन महाराज, साईबाबा आणि ताजोद्दीन बाबा या संताच्या कार्यासोबतच या संताच्या संस्थानवरही धोटे यांनी टिका केली आहे लाखो भक्ताची या तमाम संताबद्दल अपार श्रध्दा आहे परंतु धोटे सारख्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे हि बाब अतिशय दुर्दैवी आहे, असे अनादर करणारे वक्तव्य करणाऱ्या जांबुवंतराव धोटे यांच्यावर कठोर कारवाई करून ५ जुलैपर्यत अटक करावी, अशी मागणी श्री गजानन महाराज भक्त सेवा समितीने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे अन्यथा ५ जुलै रोजी सांयकाळी पाच वाजेपर्यत अटक न केल्यास धिक्कार आंदोलनाचा इशारा संजय शर्मा, आनंद वालकडे, बंडु कथीलकर, प्रफुल्ल चतुरकर, निकेत धोटे, बाळासाहेब भायदे, अमित उल्हे, मंगेश कविटकर, बबली पांडे, गणेश शर्मा, प्रविण बुरंगे आदींनी दिला आहे.

Web Title: The protest of Jambuwantrao Dhoten's statement