जुना धामणगावात देहव्यापार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:12 IST2021-05-23T04:12:05+5:302021-05-23T04:12:05+5:30

धामणगाव रेल्वे : देहव्यापार सुरू असलेल्या ठिकाणी दत्तापूर पोलिसांनी धाड टाकून एका युवकासह दोन युवतीला ताब्यात घेतले. दरम्यान, तेथील ...

Prostitution exposed in Old Dhamangaon | जुना धामणगावात देहव्यापार उघडकीस

जुना धामणगावात देहव्यापार उघडकीस

धामणगाव रेल्वे : देहव्यापार सुरू असलेल्या ठिकाणी दत्तापूर पोलिसांनी धाड टाकून एका युवकासह दोन युवतीला ताब्यात घेतले. दरम्यान, तेथील दोन युवक पळून गेले. ही घटना जुना धामणगाव हद्दीतील पुष्कर्णानगर परिसरात घडली.

या भागात अंजनसिंगी येथील चंद्रशेखर शिवणकर यांच्या मालकीचे घर आहेत. ते वरच्या मजल्यावर राहतात. मात्र, खालील चार खोलीमध्ये काही दिवसांपासून अनोळखी युवक-युवतींची वर्दळ वाढली होती. शनिवारी सकाळी १० वाजता या भागातील सामाजिक कार्यकर्ते संजय सायरे यांनी सदर खोल्यात युवक-युवती असल्याची माहिती दत्तापूर पोलिसांना दिली. दत्तापूरचे ठाणेदार ब्रह्मानंद शेळके व सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चौधरी यांनी संबंधित घरी धाड टाकली असता, दोन खोलीचे दरवाजे बाहेरून बंद होते. मात्र, आतून आवाज येत होता. पोलिसांनी हिसका दाखवताच दोन खोलीचे दरवाजे उघडण्यात आले. एका खोलीत जुना धामणगाव येथील २० वर्षीय युवक व एक युवती, तर दुसऱ्या खोलीत एक युवती आढळली.

पोलिसांची धाड पडल्याचे लक्षात येतात दोन युवक मागील दरवाज्यातून पळून गेले. एक युवक व दोन युवतींना दत्तापूर पोलिसांनी अटक करून असभ्य वर्तणूक अंतर्गत गुन्हे दाखल केले. नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. एका तासासाठी पाचशे रुपये मोजून काही युवक-युवती या खोल्या भाड्याने घेत असत.

Web Title: Prostitution exposed in Old Dhamangaon