पाण्याचे योग्य नियोजन, शेतकरी सुुखावला
By Admin | Updated: March 12, 2015 01:00 IST2015-03-12T01:00:05+5:302015-03-12T01:00:05+5:30
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जरूड-वरूड परिसर १९९० च्या काळातील पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर असताना ...

पाण्याचे योग्य नियोजन, शेतकरी सुुखावला
प्रशांत काळबेंडे जरुड
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जरूड-वरूड परिसर १९९० च्या काळातील पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर असताना शेतकऱ्यांची दुर्दशा पाहून तत्कालीन कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी शरद उपसा जलसिंजन नावाचा दूरदर्शी आदर्श प्रकल्प निर्माण करून जरूड परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली आहे. सध्या प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनामुळे या भागातील शेतकरी सुखावला आहे.
पाण्याच्या योग्य नियोजनामुळे हा संपूर्ण परिसर आंबिया बहाराच्या संत्राने सुजलाम् - सुफलाम् झाला आहे. शरद उपसा जलसिंचन योजनेमुळे बागायत शेतकऱ्यांना उभारी मिळाली असून तीन हजार एकर जमिन ओलिताखाली आली आहे. रखरखत्या उन्हात सन् १९९०-९५ या काळात जरूड परिसरात पाण्याच्या अतिवापरामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. शेतकरी हवालदिल झाले होते. होते नव्हते पैैसे खर्च करून वेळप्रसंगी पत्नीचे मंगळसूत्र विकून कुपनलिका शेतात खोदून कोठून पाणी मिळते कां ते पाहत होते. परंतु सुमारे १२०० ते १५०० ुफूट खोल बोअर करूनही शेतकऱ्यांना कुठेही पाणी दिसत नव्हते.
जमिनीची चाळणी करूनही पाण्याचा थेंबही शेतकऱ्यांच्या हाती लागत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. संत्र्याची उभी झाडे वाळताना पाहून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्यात. तत्कालीन कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी गावचे हें विदारक दृष्य पाहून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपाययोजनांची चाचपणी सुरू केली. त्यानंतर विरोधकांची अवहेलना व अडचणींवर मात करून उभा राहीला तो ‘शरद उपसा जलसिंचन प्रकल्प ! ’
अनेक विरोधकांनी हा प्रकल्प यशस्वी होऊच शकत नाही. असा सूर काढला होता. परंतु कोणत्याही विरोधाला न जुमानता घेतलेला चांगला निर्णय काही वर्षाने तो मैैैैैैैैलाचा दगड ठरतो. आज परीसरात केवळ शरद उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातुन पाण्याची पातळी तर वाढलीच परंतु त्या काळी वाळलेल्या संत्राच्या झाडांना नवसंंजीवनी देऊन आज आंबिया बहाराच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांची उलाढाल जरूड परिसरातून होते. जिल्ह्यात संपूर्ण रखरखत्या उन्हात संत्राच्या आंबिया बहाराला टिकवून ठेवण्याचे काम शरद उपसाचे पाणी व जरूडचे शेतकरी मोठ्या उत्साहाने करतात. एकेकाळी आपली आर्थिक परीस्थिती डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांनीही संत्र्याच्या आंबिया बहाराने नवी उभारी घेतली आहे.
दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल होवून जरूड परिसरातील आंबिया बहाराचा संत्रा देश -विदेशात पोहचला जातो. यासाठी देशातील अनेक व्यापारी परिसरात तळ ठोकून बसतात. ७५ मीटर उंचीवर १३ किलोमीटर लांबीवर ३ हजार एकर शेतीला पाणी देणारी शरद उपसा जलसिंचन योजनेचे कार्य सुस्थितीत सुरू आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेंतर्गत नाला खोलीकरण, सिमेंट, शेततळे, क ोल्हापुरी शेतबंधारे मोहीम राबविण्यात आली. ड्रायझोनमध्ये गेलेला परिसर काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे सुरू आहे.