सोने आभूषणांवरील एक्साईज ड्युटीचा निषेध
By Admin | Updated: March 15, 2016 00:37 IST2016-03-15T00:37:11+5:302016-03-15T00:37:11+5:30
केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सोने आभूषणांवर एक्साईज ड्युटी (अबकारी) लावल्याच्या ...

सोने आभूषणांवरील एक्साईज ड्युटीचा निषेध
आंदोलन : सराफा व्यापारी असोसिएशनचे धरणे
अमरावती : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सोने आभूषणांवर एक्साईज ड्युटी (अबकारी) लावल्याच्या निषेधार्थ शहरातील सराफा व्यापारी असोसिएशन, जिल्हा सवर्णकार संघ, गलाईवाले असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन केले आणि या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदविला आहे.
केंद्र शासनाने सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात सुवर्ण दागिने उत्पादक तसेच सराफा व्यवसाय करणारे व्यापारी, सुवर्ण कारागीर यांच्यावर १ टक्के आबकारी शुल्क लावून एक्साईज कायदा लावला आहे. हा अतिशय जाचक एक्साईज कायदा आहे. त्याला संपूर्ण देशभरात सुवर्ण व्यावसायिक तीव्र विरोध करून व्यापार बंद ठेवून बेमुदत आंदोलन करीत आहे. शासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे.
मात्र यावर अद्यापपर्यंतही शासनाने ठोस तोडगा काढला नाही. त्यामुळे सराफा व्यावसायिकांसाठी जाचक ठरत असलेला हा कायदा त्वरित रद्द करावा, अशी मागणी सराफा व्यापारी असोसिएशन व अन्य संघटनानी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्फत शासनाकडे केली आहे. यासंदर्भात शासनाने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचा निर्धारही सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. आंदोलनात सराफा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवरतनमल गांधी, अनिल चिमोटे, अविनाश चुटके, मिलींद श्राफ,सिमेश श्रॉफ,राजेंद्र भंसाली, किशोर वडनेरे, समीर कुबडे, प्रकाश अग्रवाल, रुरेंद्र गांधी, संपत कदम, मुकेश ठोसर, जवाहर गांधी, प्रफुल्ल गोगटे, अशोक गोगटे, राजेंद्र चांडक, सराफा व्यापारी, सुवर्णकार, गलाईवाले असो.चे पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)