अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील परसापूर ग्रामपंचायतीला दहा लक्ष रुपयांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 11:25 AM2020-06-18T11:25:47+5:302020-06-18T11:26:13+5:30

केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे या पुरस्काराची घोषणा १६ जून २०२० रोजी करण्यात आली. देशभरातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी राज्यात चौदा, तर अमरावती जिल्ह्यातील एकमेव परसापूर ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Prize of Rs. 10 lakhs to Parsapur Gram Panchayat of Achalpur taluka in Amravati district | अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील परसापूर ग्रामपंचायतीला दहा लक्ष रुपयांचे बक्षीस

अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील परसापूर ग्रामपंचायतीला दहा लक्ष रुपयांचे बक्षीस

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्यातील १४ ग्रामपंचायतींची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अचलपूर तालुक्यातील परसापूर ग्रामपंचायतीला केंद्र शासन पुरस्कृत पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारस्वरूप दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. ती जिल्ह्यातून एकमेव पुरस्कार पटकावणारी ग्रामपंचायत ठरली आहे. राज्यातील १४ ग्रामपंचायतींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०१८-१९ या वर्षासाठी जाहीर करण्यात आला आहे. केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे या पुरस्काराची घोषणा १६ जून २०२० रोजी करण्यात आली. देशभरातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी राज्यात चौदा, तर अमरावती जिल्ह्यातील एकमेव परसापूर ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद, अचलपूर पंचायत समिती व परसापूर ग्रामस्थांच्या सहकार्याने ही निवड झाली. या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येगडे, अचलपूरचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे, पंचायत समिती सदस्य विशाल काकड, विस्तार अधिकारी विनोद गेडाम, महादेव कासदेकर, माजी सरपंच अरुणा वानखडे, उपसरपंच सागर राठोड, ग्रामविकास अधिकारी विनोद गेडाम, ग्रामपंचायतीचे सदस्य मुख्याध्यापक हरीश बुंदेले, शिक्षक प्रवीण कविटकर आदींनी या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले.

Web Title: Prize of Rs. 10 lakhs to Parsapur Gram Panchayat of Achalpur taluka in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार