लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर जिल्हा काँग्रेसतर्फे इर्विन चौकात निषेध नोंदविण्यात आला.उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार करून १० जणांची हत्या करण्यात आली. या हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी सोनभद्र येथे जात असताना काँग्रेसच्या सरचिटणीस तथा उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांना वाराणसी पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली. याची वार्ता काँग्रेस कार्यकर्त्यांना कळताच देशभरात प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने रस्त्यावर उतरत भाजप सरकारच्या दडपशाही तीव्र निषेध नोंदविला. भाजप सरकारच्या कृतीविरोधात तीव्र घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. आंदोलनात शहर काँग्रेस अध्यक्ष किशोर बोरकर, विलास इंगोले, पुरुषोत्तम मुंदडा, बी.आर. देशमुख, अभिनंदन पेंढारी, हरिभाऊ मोहोड, भैयासाहेब निचळ, कुंदा अनासाने, भास्कर रिठे, गणेश पाटील, सलीम मिरावाले, अतुल काळबांडे, करिमा बाजी, जयश्री वानखडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यक़र्ते सहभागी झाले होते.युवक काँग्रेसनेही केला निषेधकॉग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटके चा शुक्रवारी युवक काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर निषेध नोंदविला. यावेळी काळ्या फिती बांधून भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख, जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, नीलेश गुहे, प्रद्युम्न पाटील, अंकुश जुनघरे, रोहित देशमुख, आदित्य पाटील, शुभम वसू, विकास इंगळे, सूरज अडायके, रवि रायबोले, गणेश थावराणी, सौरभ किरकटे आदीचा समावेश होता.
प्रियंका गांधी यांना अटक, शहर काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:44 IST
अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर जिल्हा काँग्रेसतर्फे इर्विन चौकात निषेध नोंदविण्यात आला.
प्रियंका गांधी यांना अटक, शहर काँग्रेसची निदर्शने
ठळक मुद्देआंदोलन : भाजप सरकारच्या दडपशाहीविरोधात घोषणाबाजी