शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या सांगण्याहून प्रियकरानेच केली चोरी

By admin | Updated: February 28, 2015 00:36 IST

प्रियकराला सांगून तिने आपल्याच घरी चोरी करवून घेतल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. माधवी विहारात पाच दिवसांपूर्वी २ लाख ८० हजारांची घरफोडी झाली होती.

अमरावती : प्रियकराला सांगून तिने आपल्याच घरी चोरी करवून घेतल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. माधवी विहारात पाच दिवसांपूर्वी २ लाख ८० हजारांची घरफोडी झाली होती. तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरासह त्या मुलीलाही अटक केली आहे. माधवी विहारात २२ फेब्रुवारी रोजी भरदिवसा २ लाख ८० हजारांची चोरी झाली होती. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला होता. याच्या चौकशीतून पोलिसांनी पॅराडाईज कॉलनीतील रहिवासी शेख वसीम शेख रहमत (३२) याला अटक केली असून त्यांच्याकडून १०० ग्रॅमचे सोन्याचे ऐवज जप्त केले आहे. आरोपी हा वाहन चालक असून तो विवाहित आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन थोरात, प्रणय वाघमारे, दीपक श्रीवास, संदीप देशमुख, चैतन्य रोकडे यांच्या पथकाने गुप्त माहितीवरुन आरोपी शेख वसीम याची चौकशी केली. त्यामध्ये मुलीच्या सांगण्याहून ही चोरी केल्याची आरोपीने कबुली दिली.माधवीनगरातील २७ वर्षिय मुलगी डेंटल कॉलेजची विद्यार्थिनी आहे.घटनेपूर्वीही तिने प्रीयकरासाठी सोन्याचे दागिने चोरी केले होते. तिने प्रियकराला भेटण्याकरिता कांता नगरात एक खोली भाड्याने घेतली आहे. त्या ठिकाणी दोघेही भेटत होते. चोरी करण्यापूर्वी तिने प्रियकराला कुलुपाची चावी दिली होती. त्यानंतर ती कुटुबींयासोबत लग्नकार्यात गेली. प्रियकराने २ लाख ८० हजारांचे दागिने लंपास केले. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ऐवज व पैसे जप्त केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती मुलगी लग्न करणार होती. (प्रतिनिधी)