कैद्यांच्या तपासणीला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:01 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:01:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कैद्यांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य दिले जात आहे. येथील मध्यवर्ती कारागृहातील दवाखान्यात ...

कैद्यांच्या तपासणीला प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कैद्यांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य दिले जात आहे. येथील मध्यवर्ती कारागृहातील दवाखान्यात नियमित तपासणीदरम्यान सर्दी, खोकला, ताप आणि श्वसनाचा त्रास असलेल्या कैद्यांची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. कारागृहातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी याकडे प्राधान्याने लक्ष देत आहेत.
मुंबई विभागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाच कारागृहे ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. यात मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखेडा जिल्हा कारागृह व कल्याण जिल्हा कारागृहांचा समावेश आहे. ‘लॉकडाऊन’ करण्यात आलेल्या या पाचही कारागृहात अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये कर्तव्य बजवावे लागत आहे. कर्तव्याच्या काळात कर्मचाऱ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासनाला करावी लागत आहे.
कुटुंबीयांना काही समस्या निर्माण झाल्यास ते कारागृहात संपर्क साधू शकतील, त्याकरिता प्रशासनाकडून संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वाराला कारागृह अधीक्षकांच्या स्वाक्षरीने सील करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच ते सील उघडले जातील, अशी माहिती आहे. मात्र, कोरोना विषाणूचे संकट गडद होत चालल्याने विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या आरोग्याची निगा राखली जात आहे. त्यानुसार कारागृहातील दवाखान्यात नियमित तपासणी केली जात आहे. विशेषत: सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास असलेल्या कैद्यांची काळजी घेण्यात येत आहे. गत १५ दिवसांपासून विशेष आरोग्य तपासणीत गंभीर स्वरूपाच्या आजाराचे कैदी निर्दशनास आले नाही, हे विशेष.
अधिकारी, कर्मचाºयांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. कारागृहात ‘सोशल डिस्टन्सिंट’चे पालन करण्यात येत आहे. तसेच कैद्यांच्या नियमित आरोग्य तपासणीला प्राधान्य देण्यात येत असून, काळजी घेतली जात आहे.
- रमेश कांबळे, अधीक्षक,
मध्यवर्ती कारागृह अमरावती.