‘व्हॉईस आॅफ अमरावती’ची प्राथमिक फेरी रंगली

By Admin | Updated: December 23, 2015 00:22 IST2015-12-23T00:22:34+5:302015-12-23T00:22:34+5:30

अंगभूत कलागुणांना चालना देण्यासाठी आणि युवा मनाला योग्य नेतृत्व देण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट आणि शैक्षणिक क्षेत्रात योग्य करिअर घडविण्यासाठी...

The primary round of 'Voice of Amravati' was played | ‘व्हॉईस आॅफ अमरावती’ची प्राथमिक फेरी रंगली

‘व्हॉईस आॅफ अमरावती’ची प्राथमिक फेरी रंगली

अंतिम फेरी आज : लोकमत युवानेक्स्ट, रायसोनी ग्रुपचा उपक्रम
अमरावती : अंगभूत कलागुणांना चालना देण्यासाठी आणि युवा मनाला योग्य नेतृत्व देण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट आणि शैक्षणिक क्षेत्रात योग्य करिअर घडविण्यासाठी कटिबद्ध असलेले रायसोनी ग्रुप आॅफ इंस्टिट्यूशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन (सीनीयर व ज्यूनिअर) युवक युवतींसाठी भव्य गायन स्पर्धा व्हॉईस आॅफ अमरावती आयोजित केली आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी २१ डिसेंबर २०१५ रोजी स्थानिक टाऊन हॉल येथे दुपारी ४ वाजता पार पडली. या फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवक-युवतींनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करून रसिक श्रोत्यांची प्रशंसा मिळविली. या फेरीतून २० ते २२ स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. याच स्पर्धकांमधून ‘रायसोनी व्हॉईस आॅफ अमरावती-२०१६’ ची निवड करण्यात येईल. प्रथम फेरीत प्रियंका चव्हाण, विकास शिंदे, महेश बेंडे, सावित्री गावत्रे, आदर्श तायडे, सुदत्ता नंदागवळी, महेश धुर्वे, प्रियंका रेचे, अस्मिता काळे, प्रणय चक्रवर्ती, सानीश्री चक्रे, प्रज्ज्वल खंडारे, नीशा कांबळे, अक्षय कोटोरे, सौरभ नाशिककर, दीपक सुतवणे, शिवाजी कडू, सुनील जामनिक, सुजित कोलानकर, अनुराग खांडेकर, आल्हाद काळे, मोहिनी मानेकर हे विजेते ठरले.
या विजेत्यांची अंतिम फेरी २३ डिसेंबर रोजी स्थानिक शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या केशवराव भोसले सभागृहात दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या स्पर्धेला नेहमीच युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
या स्पर्धेत जास्तीत जास्त युवा कलाकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या निमित्ताने गीत-संगीताची मेजवानी समस्त रसिकांना मिळणार आहे. एकूणच नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या कलेची जोपासना करण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून होणार आहे. अंतिम फेरीत सर्व युवा नेक्स्ट सदस्य, सखीमंच सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोेजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The primary round of 'Voice of Amravati' was played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.