वरूड पंचायत समितीत कृषिदिनी शेतकऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST2021-07-04T04:09:21+5:302021-07-04T04:09:21+5:30

वरूड : हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात आली. वरूड पंचायत समितीत ...

Pride of farmers on Agriculture Day in Warud Panchayat Samiti | वरूड पंचायत समितीत कृषिदिनी शेतकऱ्यांचा गौरव

वरूड पंचायत समितीत कृषिदिनी शेतकऱ्यांचा गौरव

वरूड : हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात आली. वरूड पंचायत समितीत तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, विस्तार अधिकारी राहुल कांबळे, तालुका कृषी अधिकारी संतोष सातदिवे, बंडू गोळे, मनोज माहुलकर उपस्थित होते. यावेळी राजेंद्र ताथोडे (बेलोरा), दिलीप बरांगे (वाडेगाव), विवेक फुटाणे (शेंदूरजनाघाट), योगेश देशमुख (टेंभूरखेडा), पंकज देशमुख (जरूड), तुळशीराम मोरापे (माणिकपूर), पांडुरंग सरयाम (माणिकपूर), सहानु कुडसिंगे (माणिकपूर), ओंकार श्रीराव (लोणी), मारोती गजाम (भेमडी), उल्हास वनखडे (नांदगाव), उमेश ठाकरे (हातुर्णा), नीलेश यावले (उदापूर) या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Pride of farmers on Agriculture Day in Warud Panchayat Samiti