शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव, आरोपीवर बलात्कारासह अॅस्ट्रोसिटीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 18:12 IST

प्रेमसंबध प्रस्थापित करून एका तरुणीचे अपहरण केले आणि लैंगिक अत्याचारानंतर धर्मांतरासाठी तिला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. 

अमरावती -  प्रेमसंबध प्रस्थापित करून एका तरुणीचे अपहरण केले आणि लैंगिक अत्याचारानंतर धर्मांतरासाठी तिला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी फईम अब्दुल जाकीर अब्दुल (२२, रा. राहुलनगर) याच्याविरुद्ध बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.      आरोपी फईम अब्दुल याने एका १८ वर्षीय मुलीशी प्रेमसंबध प्रस्थापित करून तिला विवाहबंधनात अडकविले. तिच्याशी शारीरिक संबंध झाल्यानंतर त्याने तिला मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा आग्रह धरला. एवढेच नव्हे तर तिने तयार व्हावे, यासाठी घरात डांबून ठेवले आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. फईमने तिच्या आई-वडिलांच्या आजाराचा फायदा घेऊन माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडित तरुणीने फे्रजरपुरा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी फईम अब्दुलविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३६६, ३४१, २९५ (अ), ३७६ (अ), ३८४, ५०६, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टच्या कलम ३(२) नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त पी.डी. डोंगरदिवे करीत आहेत. 

लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरासाठी धमक्या दिल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. - आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा 

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाAmravatiअमरावतीPoliceपोलिस