वरुडकर यांना राष्ट्रपती पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:45 IST2019-01-25T22:44:59+5:302019-01-25T22:45:17+5:30
वाचक शाखेत प्रशंसनीय व उत्कृष्ट सेवा देणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार नत्थुजी वरुडकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या हस्ते वरुडकर यांचा सत्कार करण्यात आला.

वरुडकर यांना राष्ट्रपती पदक
अमरावती : वाचक शाखेत प्रशंसनीय व उत्कृष्ट सेवा देणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार नत्थुजी वरुडकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या हस्ते वरुडकर यांचा सत्कार करण्यात आला. वरुडकर हे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त यांच्या वाचक शाखेत एएसआय म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ३७ वर्षांची सेवा निष्कलंक राहिली.
आतापर्यंत ६८३ बक्षिसे प्रदान
:सेवाकाळात कुठल्याही प्रकारची शिक्षा प्राप्त नाही. त्यांना आजपर्यंत ६८३ बक्षिसे प्रदान करण्यात आली आहेत. वरुडकर यांनी पोलीस मुख्यालय, राजापेठ, वलगाव, नियंत्रण कक्ष, गुन्हे शाखा व वाचक शाखेत उत्कृष्ट सेवा दिली. त्याच्या उत्कृष्ट कार्यांची दखल घेत पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी राष्ट्रपती पदकाची शिफारस पोलीस महासंचालक यांच्यामार्फत शासनाकडे केली होती. त्यानुसार त्यांच्या सेवातपशिलांची तपासणी करून वरुडकर यांना प्रशंसनीय सेवाचा सन्मान देण्यात आला. प्रजासत्ताक दिनीनिमीत्त वरुडकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.