लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी एकाच दिवसात तीन बालकांसह गर्भवती मातेचा मृत्यू झाला. धुळघाट रेल्वे आरोग्य केंद्रांतर्गत राहणाऱ्या नर्मदा चिलात्रे (वय २०, रा. सालाईबर्डी) या गर्भवतीला दुपारी २:०० वाजता धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. तिची ही पहिलीच प्रसूती. तिला सिझरसाठी नेण्यात आले असता तिला झटके आले. उपचार करण्यात आले. परत दोन वेळा झटके आले आणि प्रकृती खालावली. प्रसूतीपूर्वीच माता दगावली, तर बाळ पोटातच दगावले.
धुळघाट रेल्वे येथील श्रीराम धांडे यांची पत्नी कविताने एक मुलगी व एक मुलगा या जुळ्यांना जन्म दिला; परंतु नवजात एका बाळाच्या जन्मानंतर अल्पावधीतच मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत बैरागड येथील सबा तनवीर मो. नदीम यांना केवळ २८ आठवड्यांवर प्रसूती झाली. अकाली झालेल्या या प्रसूतीत सुमारे ८०० ग्रॅम वजनाचे बाळ जन्माला आले. अत्यल्प वजन आणि नाजूक प्रकृतीमुळे वैद्यकीय उपचार सुरू असताना या बाळाचा मृत्यू झाला.
शनिवारी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते; परंतु तिला झटके आल्याने प्रकृती खालावली. महिला दगावली, तर बाळ पोटात दगावले. सोबत अजून एका बाळाचा मृत्यू झाला आहे. डॉ. दयाराम जावरकर, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, धारणी
Web Summary : Tragedy struck Dharani sub-district hospital as a pregnant woman and three infants died on Saturday. Complications during labor and premature births led to the unfortunate deaths. Authorities are investigating the circumstances surrounding these incidents.
Web Summary : धारणी उपजिला अस्पताल में शनिवार को एक गर्भवती महिला और तीन शिशुओं की मौत हो गई। प्रसव के दौरान जटिलताओं और समय से पहले जन्म के कारण दुर्भाग्यपूर्ण मौतें हुईं। अधिकारी इन घटनाओं के आसपास की परिस्थितियों की जांच कर रहे हैं।