शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात जोखमीच्या मातेचा वाटेतच मृत्यू, आरोग्य कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 11:04 IST

अति जोखमीची माता म्हणून नोंद असलेल्या महिलेला सोमवारी प्रसववेदना सुरू झाल्या. मात्र, गावात एकही आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने गावातील दाईने प्रसूतीसाठी प्रयत्न केला. परंतु दाईला अडचण जात असल्याने महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे ठरविले.

ठळक मुद्देमेळघाटात मातामृत्यूचे सत्र सुरुचजबाबदार कोण?

चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ आरोग्य केंद्रांतर्गत पिपल्या गावातील बुदिया कासदेकर या प्रसूत महिलेचा रुग्णालयात पोहाेचण्यापूर्वी वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली.  विशेष म्हणजे, यावेळी एकही आरोग्य कर्मचारी गर्भवती महिलेसोबत नसल्याची माहिती समोर आली आहे.

पिपल्या गावातील अति जोखमीची माता म्हणून नोंद असलेल्या बुदिया कासदेकर (२६) या गर्भवती मातेला २८ डिसेंबर रोजी प्रसववेदना सुरू झाल्या. मात्र, गावात एकही आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने गावातील दाईने प्रसूतीसाठी प्रयत्न केला. परंतु दाईला अडचण जात असल्याचे लक्षात आल्याने तत्काळ महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे ठरविले. त्यानंतर आशा सेविकेसह घरच्यांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रात्री ११ वाजता दरम्यान चुरणी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वाटेत रुग्णवाहिकेत महिलेने प्राण सोडला. तर, या महिलेला रुग्णालयात हलविण्यात आले तेव्हा एकही आरोग्य कर्मचारी सोबतीला नव्हता.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ती गर्भवती महिला पाचव्यांदा गर्भवती असताना आणि जोखमीच्या मातांमध्ये नोंद असतानाही तिची एकदाही सोनोग्राफी केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अशावेळी आरोग्य कर्मचारी कुठे होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, गर्भवती महिलेचा मृत्यू कशाने झाला याची माहिती शवविच्छेदन नंतरच मिळणार आहे.

मातेला रुग्णालयात दाखल केले तेव्हा मृत झाली होती. तिचा घरी किंवा वाटेतच अतिरक्त स्राव झाल्यामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी महिलेचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय रेकॉर्ड उपलब्ध नव्हते.

- डॉ. रोशन इंगळे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय चुरणी

सदर महिलेचा मृत्यू चुरणी रुग्णालयात झाल्याची माहिती मला मिळाली. मात्र मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी करण्यात येईल. त्यानंतरच खरे कारण पुढे येईल.

- डॉ. राजश्री माहूरकर, वैद्यकीय अधिकारी काटकुंभ पीएचसी

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूpregnant womanगर्भवती महिलाPregnancyप्रेग्नंसीMelghatमेळघाटChikhaldaraचिखलदरा