प्रवीण पोटे यांचा राजीनामा, अनिल बोंडेंना राज्यमंत्रिपदी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:20 AM2019-06-16T01:20:18+5:302019-06-16T01:21:05+5:30

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा समावेश होणार आहे. विद्यमान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिल्याचे वक्तव्य अंजनगाव सुर्जी येथील एका कार्यक्रमात शनिवारी केले.

Praveen Pote resigns, Anil Bondenna becomes Minister of State for Opposition | प्रवीण पोटे यांचा राजीनामा, अनिल बोंडेंना राज्यमंत्रिपदी संधी

प्रवीण पोटे यांचा राजीनामा, अनिल बोंडेंना राज्यमंत्रिपदी संधी

googlenewsNext
ठळक मुद्देराजकीय घडामोडींना वेग । पालकमंत्रिपदाचेही संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा समावेश होणार आहे. विद्यमान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिल्याचे वक्तव्य अंजनगाव सुर्जी येथील एका कार्यक्रमात शनिवारी केले. यामुळे आता बोंडे यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकत्वाची धुरादेखील राहणार असल्याची चर्चा आहे.
विद्यमान पालकमंत्री प्रवीण पोटे हे विधान परिषद सदस्य आहेत. जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी अमरावती, दर्यापूर, मेळघाट व मोर्शी येथे भाजपचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीचे ४१ खासदार निवडून आले. तथापि, अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी पराभव केला.
या पराभवाचीे नैतिक जबाबदारी स्वीकारीत २४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती अंजनगावातील कार्यक्रमात ना. पोटे यांनी दिली.
डॉ. अनिल बोंडे हे मोर्शी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. यापूर्वी ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. ५४ वर्षांचे आमदार बोंडे हे एमबीबीएस, एमडी आहेत. १९९६ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २००२ ते २००५ या कालावधीत ते जिल्हाप्रमुख होते. त्यांनी २००४ मध्ये शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्यांचा १३०० मतांनी पराभव झाला होता. २००९ मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून सात हजार मतांनी निवडून आलेत. त्यांनी २६ आॅगस्ट २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ते ४१ हजार मतांनी विजयी झाले होते.

Web Title: Praveen Pote resigns, Anil Bondenna becomes Minister of State for Opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.