परतवाडा येथे प्रतिभा साहित्य संघाचा पुरस्कार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST2020-12-17T04:39:24+5:302020-12-17T04:39:24+5:30
यंदाचा राज्यस्तरीय कविवर्य विठ्ठल वाघ तिफन पुरस्कार लोणार येथील कवी विशाल इंगोले यांना दिल्या जाणार आहे. स्व.बापुरावजी पाटील तुरखडे ...

परतवाडा येथे प्रतिभा साहित्य संघाचा पुरस्कार सोहळा
यंदाचा राज्यस्तरीय कविवर्य विठ्ठल वाघ तिफन पुरस्कार लोणार येथील कवी विशाल इंगोले यांना दिल्या जाणार आहे. स्व.बापुरावजी पाटील तुरखडे उदीम पुरस्कार प्रश्नचिन्ह या संस्थेचे संस्थापक मतीन भोसले यांना दिल्या जाणार आहे. या सोबतच प्रतिभा कर्मदीप पुरस्काराचे वितरण होणार आहे. लोककवी विठ्ठल वाघ अमृत महोत्सव साहित्य पंढरीचा विठ्ठल या गौरव ग्रंथाचा लोकार्पण समारंभ, कविवर्य गजानन मते यांच्या "आम्ही माणसं मातीचे" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ कवी विजय सोसे सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल निरोप समारंभ होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रतिभा साहित्य संघाचे प्रमोद तुरखडे, विनोद घुलक्षे, राजकुमार महल्ले, अरुण मोडक, अमरावती जिल्हाध्यक्ष मंगेश वानखडे, कर्मदीपचे राजेन्द्र ठाकरे, बाळासाहेब भुले, अकोला जिल्हाध्यक्ष अरुण काकड, जि.प.सदस्य गोपाल कोल्हे, विजय डकरे, गझलकार नितीन देशमुख, विलास पंचभाई, संजय गुल्हाने, रणजित काळमेघ, अशोक चव्हाण, राहुल साळविकर, अभिषेक गावंडे, पावर ऑफ मिडियाचे गजाननराव देशमुख, थरारचे लेखक गजाननराव सानवणे, विनोद शिंगणे, प्रवीण कावरे शैलेश लोखंडे, संदीप वाटाणे, सातपुते, विजय वानखेडे, किरण कांडलकर, सुदर्शन काळे, दीपक उमक, कवी विशाल कुलट, अनंता कुलट, संजय चोबितकर, गजानन बेलसरे, दीपक खानझोडे, सुधीर जाणे व इतर मान्यवर उपस्थित राहतील.