मोर्शीच्या नगराध्यक्षपदी प्रतिभा कटीस्कर
By Admin | Updated: August 16, 2014 23:12 IST2014-08-16T23:12:36+5:302014-08-16T23:12:36+5:30
शनिवारी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशोक रोडे गटाच्या प्रतिभा कटीस्कर विजयी झाल्या. अवघे तीन नगरसेवक असलेल्या रोडे गटाच्या त्या उमेदवार होत्या. न्या निवडणुकीत

मोर्शीच्या नगराध्यक्षपदी प्रतिभा कटीस्कर
मोर्शी : शनिवारी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशोक रोडे गटाच्या प्रतिभा कटीस्कर विजयी झाल्या. अवघे तीन नगरसेवक असलेल्या रोडे गटाच्या त्या उमेदवार होत्या. न्या निवडणुकीत कटीस्कर यांना ११ तर प्रतिस्पर्धी उमेदवार वंदना बोरकर यांना आठ मते मिळालीत. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार विजय माळवी यांनी कटीस्कर यांच्या निवडीची घोषणा केली.
जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमधील नगराध्यक्षपदाची निवडणूक जुलै महिन्यात पार पडली. परंंतु हे नगराध्यक्षपद सतत चौथ्यांदा महिलांकरिता आरक्षित असल्याने शहराचा विकास रखडल्याचा ठपका ठेऊन येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप कुऱ्हाडे यांनी महिला आरक्षणाविरुध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे मोर्शी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला न्यायालयाने स्थगनादेश दिल्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक जुलै महिन्यात झाली नव्हती. शनिवारी नगराध्यक्ष पदाची माळ प्रतिभा कटीस्कर यांच्या गळ्यात पडली.