जिल्ह्यातील ६४५ गावांत महिलांच्या डोक्यावर हंडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST2021-03-05T04:13:56+5:302021-03-05T04:13:56+5:30

पाणीटंचाईचा १५ कोटी २ लाखाचा आराखडा मंजूर अमरावती : दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील गावांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. ...

Pots on women's heads in 645 villages in the district! | जिल्ह्यातील ६४५ गावांत महिलांच्या डोक्यावर हंडा !

जिल्ह्यातील ६४५ गावांत महिलांच्या डोक्यावर हंडा !

पाणीटंचाईचा १५ कोटी २ लाखाचा आराखडा मंजूर

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील गावांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. यावर्षीही उन्हाळ्याच्या झळा लागायला सुरुवात झाली असून जानेवारी ते मार्च मध्ये संभाव्य टंचाईच्या गावात टंचाई भासली नाही तर एप्रिल ते जून या कालावधीत ६४५ गाव वाड्या वस्त्या पाणीटंचाईची शक्‍यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या सुमारे १५ कोटी २ लाख ६८ हजार रुपये आराखड्यात मान्यता दिली आहे.

जिल्ह्यात अद्याप टंचाईची स्थिती निर्माण झाली नसल्याने उपाययोजना कराव्या लागल्या नसल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. झेडपी पाणीपुरवठा विभागाने जानेवरी ते जून २०२१ करिता पाणीटंचाई निवारणार्थ जिल्ह्यातील १५८८ गावांपैकी ६४५ गावांत ९२२ योजनांच्या उपाययोजनांचा प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकारी नवाल यांनी या संभाव्य टंचाई आराखड्यास मंजुरी प्रदान केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अभियंता जितेंद्र गजबे यांनी दिली. मंजूर आराखड्यानुसार विंधन विहिरी घेणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, तात्पुरती पूरक नळयोजना कार्यान्वित करणे, टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे, विहीर खोलीकरणास प्राधान्य देणे, तसेच रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यात टंचाई जावण्यास प्रारंभ झाला आहे. सध्याच्या स्थितीत टँकरने पाणीपुरवठा करणे आवश्यकता भासली नसली तरी जिल्ह्यातील १४ ठिकाणी गावांना पाणी पुरवठयासाठी विहीरींचे अधिग्रहण करूण पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे दरवर्षी उन्हाळयाचे दिवसात पाणीटंचाईची सर्वाधिक झळ ही मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील गावांना अधिक सहन करावी लागते. या गावांसह गैरआदिवासी भाग असलेल्या १२ तालुक्यातील काही गावांना पाणीपुरठ्यासाठी ३० ते ४० टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.

बॉक्स

१४ विहिरींचे अधिग्रहण

उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता जिल्ह्यातील विविध गावांत मार्च महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते. यंदाही काही गावांत पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाभरात १४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

बाॅक्स

पाणीटंचाईसाठी आराखडा तयार

जिल्ह्यात यावर्षी पाऊस समाधान कारक बरसला. त्यामुळे पाणी टंचाईचा आराखडा विविध कारणांमुळे विलंबाने तयार करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाने सन २०२१-२२ साठी सुमारे १५ कोटी २ लाख ६८ हजार रुपयांचा आराखडा तयार केला. सदर आराखडा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला असून यामध्ये पाणीटंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत.

बॉक्स

तूर्तास टँकरने पाणी नाही

दरवरषी मेळघाटातील विशेषत: चिखलदरा तालुक्याती एकझिरा,सोनापूर,कोयलारी,पाचडोंगरी, सोमवारखेडा, मलकापूर, आकी ,तारूबांधा, बाहदरपूर, धरमडोह, मनभंग,मोथा,कोरडा आदी गावात दरवर्षी टॅकरने पाणी पुरवठा करावा लागतो.मात्र सध्या गावात पाणी पुरवठयासाठी टॅकर लावण्याची गरज पडली नाही.विशेष म्हणजे गत वर्षी मेळघाटातील २४ गावात २५ टॅकर सुरू करण्यात आले होते.

बॉक्स

२२१ योजनांची होणार दुरूस्ती

झेडपी पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखडयात यावर्षी विविध ठिकाणच्या २२१ पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती केली जाणार आहे.याशिवाय ९४ नवीन कुपनलिका केल्या जाणारा आहेत.यामध्ये मोशी,वरूड आणि दर्यापूर ही तालुके वगळता अन्य १२ तालुक्यात या कुपनलिका प्रस्तावित केलेल्या आहेत.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण गावे-१५८८

बोरवेलची दुरूस्ती होणार-००

विहिरीतील गाव काढणे -००

पाणीटंचाईची संभाव्य गावे-६४५

जिल्ह्यात बोअरवेलचे खोदकाम होणार -९४

पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती २२१

Web Title: Pots on women's heads in 645 villages in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.