एका तरुणाचे ६ तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल ! अमरावती जिल्ह्यात खळबळ
By प्रदीप भाकरे | Updated: April 13, 2026 15:22 IST2026-04-13T15:21:06+5:302026-04-13T15:22:33+5:30
Amravati : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, जिल्ह्यातील परतवाडा येथे एका १९ वर्षीय तरुणाचे सहा वेगवेगळ्या तरुणींसोबतचे अश्लील (न्यूड) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Pornographic video of a young man with 6 young women goes viral! There is a stir in Amravati district
अमरावती: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, जिल्ह्यातील परतवाडा येथे एका १९ वर्षीय तरुणाचे सहा वेगवेगळ्या तरुणींसोबतचे अश्लील (न्यूड) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने तपास चक्रावून संशयितना कारवाईच्या टप्प्यात आणले आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, अमरावती ग्रामीण पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करून संबंधित नराधमाला अटक करावी, अशी मागणी केली आहे.
अमरावती ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या १९ वर्षीय तरुणाची आणि हे व्हिडिओ टेलिग्रामवर व्हायरल करणाऱ्या त्याच्या मित्राची ओळख पटवली आहे. हे दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात असून कुण्या पीडिता वा तिच्या कुटुंबातील कुण्या सदस्याने तक्रार दिल्यास त्यांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असे संकेत मिळत आहेत.
व्हिडिओमधील तरुणी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. पीडितांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे. तक्रारदार आणि पीडितांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवली जातील, असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले.
व्हिडिओ व्हायरल करणारा तरुण हा मुख्य आरोपीचा मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी करणार आहेत.