रिद्धपूर-बर्हाणपूर, बेलोरा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST2020-12-05T04:17:59+5:302020-12-05T04:17:59+5:30
खड्डेच खड्डे : रिध्दपूर : सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर ते बर्हानपूर ते बेलोरा या रस्त्याची ...

रिद्धपूर-बर्हाणपूर, बेलोरा रस्त्याची दुरवस्था
खड्डेच खड्डे :
रिध्दपूर : सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर ते बर्हानपूर ते बेलोरा या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बर्हानपूर येथील नागरिकांना रिद्धपूर ही मुख्य बाजार पेठ आहे. येथे रोज ये-जा करण्याकरिता वाहनधारक व ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
संबंधित ठेकेदाराने लॉकडाऊनपूर्वी काही काम केले. मात्र, अनलॉकनंतर कंत्राटदार फिरकला नाही. येथील सामाजिक कार्यकर्ता महेश ढगे यांनी त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांना टोलविण्यात आले. संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली असून, तो काम करण्यास तयार नसेल, तर त्याला काळ्या यादीत टाकून अन्य कंत्राटदार नेमण्यात येईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याच्या बांधकामास मुहुर्त मिळालेला नाही.