12 तासांच्या पावसात प्रशासनाची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST2021-09-08T05:00:00+5:302021-09-08T05:00:57+5:30

सोमवारी सायंकाळी ६ नंतर सुरू झालेला पाऊस मंगळवारी सुरूच होता. रात्रभर जोराचा पाऊस पडला. परिणामी बडनेराच्या नवीवस्ती स्थित बालाजीनगर चक्क पाण्याखाली आले होते. अमरावती येथील जयस्तंभ चौक, राजकमल चौक, नमुना, इर्विन चौक, रेल्वे स्थानक चौक येथील व्यापारी संकुलाच्या गाळ्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. बहुतांश व्यावसायिकांचे साहित्य, मोबाईल, किराणा माल भिजल्याने आर्थिक फटका बसला. आऊटलेट नसल्याने हा प्रकार घडला, असे चित्र आहे.

Polkhol of the administration in 12 hours of rain | 12 तासांच्या पावसात प्रशासनाची पोलखोल

12 तासांच्या पावसात प्रशासनाची पोलखोल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गत १२ तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरात प्रचंड नुकसान झाले आहे. व्यापारी संकुल आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले, तर शहरातील मुख्य मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. गणेशमूर्ती पाण्यात भिजल्याने मूर्तिकारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मंगळवारी पहाटे शहरात पाणीच पाणी असे चित्र होते.
सोमवारी सायंकाळी ६ नंतर सुरू झालेला पाऊस मंगळवारी सुरूच होता. रात्रभर जोराचा पाऊस पडला. परिणामी बडनेराच्या नवीवस्ती स्थित बालाजीनगर चक्क पाण्याखाली आले होते. अमरावती येथील जयस्तंभ चौक, राजकमल चौक, नमुना, इर्विन चौक, रेल्वे स्थानक चौक येथील व्यापारी संकुलाच्या गाळ्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. बहुतांश व्यावसायिकांचे साहित्य, मोबाईल, किराणा माल भिजल्याने आर्थिक फटका बसला. आऊटलेट नसल्याने हा प्रकार घडला, असे चित्र आहे. शहरातील विलानगर, यशाेदानगर, संजय गांधीनगर, मायानगर, वडाळी या भागात पावसाचा फटका बसला. नाल्याच्या काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने तारांबळ उडाली, हे विशेष. एकूणच १२ तास कोसळलेल्या पावसाने महापालिका प्रशासनाची पोलखोल उघड केली. 

जिल्ह्यात एक मृत, १७३५ हेक्टर पिकांचे नुकसान
चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख येथील उदयभान रामराव वानखडे (७०) हे सोमवारी सकाळी ११ वाजतादरम्यान टाकळी तलावात बुडाले. चार जनावरे वाहून गेली. २११ घरांची पडझड झाली. सहा गावांचा पेढी नदीच्या पुरामुळे संपर्क तुटला, तर १७३५ हेक्टर शेतीपिकाचे नुकसान झाले, इतका मोठा अनर्थ २४ तासांच्या अतिवृष्टीने केला आहे. ६ व ७ सप्टेंबर दरम्यान दोन तालुक्यात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. 

 

Web Title: Polkhol of the administration in 12 hours of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस