पाच विषय समितीसाठी राजकीय घडामोडींना वेग

By Admin | Updated: December 23, 2014 22:56 IST2014-12-23T22:56:12+5:302014-12-23T22:56:12+5:30

जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांमध्ये रिक्त असलेल्या आठ पैकी पाच समितीसाठी चुरस वाढली असुन जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडीना वेग आला आहे . त्यामुळे सध्या जुळवा जुळवीच्या

Political developments for the five subject committee | पाच विषय समितीसाठी राजकीय घडामोडींना वेग

पाच विषय समितीसाठी राजकीय घडामोडींना वेग

अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांमध्ये रिक्त असलेल्या आठ पैकी पाच समितीसाठी चुरस वाढली असुन जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडीना वेग आला आहे . त्यामुळे सध्या जुळवा जुळवीच्या वाटाघाटीचाही प्रयन्न केला जात आहे .मात्र यातुनही मार्ग न निघाल्यास निवडणूकीचीही शक्यता वर्तविली जात आहे .
जिल्हा परिषदेच्या विविध विषय समितीत रिक्त असलेल्या निवड प्रक्रीयेत विषय समितीपैकी वित्त, महिला व बालकल्याण , आणी पशुसंवर्धन या तिन विषय समितीमध्ये सदस्य निवडीची प्रक्रीया पार पडली मात्र स्थायी, जलव्यवस्थापन , कृषी, शिक्षण , व समाज कल्याण समितीसाठी इच्छकांची संख्या जास्त असल्यामुळे चुरस वाढली आहे .ज्या पाच विषय समिती मध्ये जागा कमी अन ईच्छूकांची संख्या जास्त आहे . विशेष म्हणजे विविध पंचायत समिती अंतर्गत नव्याने सभापती म्हणून निवडूण आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियमानुसार निवड प्रक्रीयेत प्राधान्य देणे आवश्यक आहे .परंतु स्थायी , जलव्यवस्थापन , या दोन मलीदाच्या समित्या वगळता इतरही समाज कल्याण, कृषी आणी शिक्षण या समितीतही पंचायत समिती सभापतीसह जिल्हा परिषद सदस्यांनी पंसती दिली असल्याने जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांना हा तिढा सोडविण्यासाढी मोठी कसरत करावी .लागत आहे .परंतु विरोधक सत्ताधाऱ्यांशी कित पत जुळवून घेतात यावर या समितीची निवड प्रक्रीया अंवलबुन आहे.

Web Title: Political developments for the five subject committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.