शहरात पोलिसांची एकता रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 21:56 IST2018-10-31T21:56:00+5:302018-10-31T21:56:25+5:30
वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहरात पोलिसांची बुधवारी रॅली काढून एकतेचा संदेश दिला. सोबत राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून एकतेची शपथ घेतली. या रॅलीत पाचशेवर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहरात पोलिसांची एकता रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहरात पोलिसांची बुधवारी रॅली काढून एकतेचा संदेश दिला. सोबत राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून एकतेची शपथ घेतली. या रॅलीत पाचशेवर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बुधवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शहरात पोलीस एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलिसांनी राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ घेतली. त्यानंतर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली.
पोलीस मुख्यालय येथील परेड ग्राउंड येथून निघालेली रॅली बसस्थानक, रेल्वेस्थानक, राजकमल चौक, जयस्तभं चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, पोलीस पेट्रोलपंप चौक मार्गाने परत पोलीस मुख्यालयात येऊन समारोप करण्यात आला.
या रॅलीत पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशीकांत सातव, एसआरपीएफचे महेश चिमटे, सहायक पोलीस आयुक्त रणजित देसाई तसेच ग्रामीण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आर.डी.आय. के. कॉलेजचे प्राध्यापक उपस्थित होते. या पोलीस एकता रॅली मध्ये ५०० पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.