शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

'ती'चा रेल्वेसमोर झोकून देण्याचा प्रयत्न; तितक्यात पोहोचली 'खाकी'

By प्रदीप भाकरे | Published: October 06, 2022 6:49 PM

रेल्वे स्टेशनवर आत्महत्या करत असलेल्या महिलेचा पोलिसांनी जीव वाचवला. 

अमरावती : बस्स, संपले, आता जगायचेच नाही. आता केवळ मरणच, असा आतातायी विचार करून तिने चक्क बडनेरा रोडवरील रेल्वे ट्रॅक गाठला. रेल्वेसमोर झोकून देऊन प्राण त्यागायचे, असे मनोमनी ठरवत ती रेल्वे ट्रॅकवर सुसाट धावू लागली. ही माहिती मिळताच 'खाकी'ही पोहोचली. ती पुढे, अन् खाकी मागे. अखेर १५/२० मिनिटांनी महिलापोलिसांनी तिला ट्रॅकवरून मागे सारले. 

४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अमरावती-बडनेरा रेल्वे ट्रॅकवरील सिपना कॉलेजजवळील रेल्वे रुळावर ही घटना घडली. राजापेठ पोलिसांनी तिचे प्राण वाचविले. तिचे समुपदेशन करून तिला सुखरूप तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. एक २२ वर्षीय तरूणी मानसिक तणाव व नैराश्यातून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात सिपना कॉलेजजवळ रेल्वे रुळावर पळत असल्याची माहिती राजापेठच्या बिट मार्शलला मिळाली. त्यांनी त्याबाबत ठाणेदार मनीष ठाकरे यांना लागलीच कळविले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार मनीष ठाकरे ताफ्यासह घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळ बडनेरा ठाण्याच्या हद्दीत असल्याने तेथील पोलिसांनाही माहिती देण्यात आली. सोबतच ठाणेदार मनीष ठाकरे यांनी रेल्वे पोलीस निरिक्षक शर्मा यांच्याशी संपर्क साधून त्या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेगाड्या थांबविण्यास सांगितले. दामिनी पथकालाही पाचारण करण्यात आले.

ती समोर अन् पोलीस मागेठाणेदार ठाकरे तेथे पोहोचले असता, ती तरूणी रेल्वे ट्रॅकवर धावताना दिसली. महिला पोलिसांनी तिला साद घातली. मात्र कुठलाही प्रतिसाद न देता ती धावत राहिली. ती समोर अन् पोलीस मागे. अखेर एक किमी अंतरावर ती स्वत:च थांबली. महिला पोलिसांनी लागलीच तिला रेल्वे ट्रॅकच्या दूर नेले. यावेळी ठाणेदार मनीष ठाकरे यांनी तिची विचारपूस केली. त्यामुळे ती आत्महत्येच्या आत्मघातकी विचारांपासून मागे फिरली. तिने मानसिक व आर्थिक तणावात असल्याचे सांगितले. बराच वेळ समजूत काढल्यानंतर ती शांत झाली. त्यानंतर तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

असंबंद्ध केली बडबडठाणेदार ठाकरे यांच्यासह महिला पोलीस अधिकारी अंमलदारांनी तिला प्रथम धीर दिला. तिच्याकडून कारण समजून घेतले. मात्र पहिला अर्धा तास ती असंबद्ध बडबडत राहिली. पुढे बॉटलभर पाणी गटागट पित तिने दिर्घ उसासा सोडला. मॅथची शिकवणी लावावी लागेल, त्यासाठी २१ हजार रुपये महिना द्यावा लागेल, तेवढी पैसे नाहीत, मी लहानग्यांची ट्युशन घेते. मात्र त्यातून केवळ घरखर्च भागतो, पुढे काय, असा प्रश्न तिला पडल्याची पोलिसांच्या लक्षात आले. आर्थिक विवंचना आणि त्यापाठोपाठ आलेल्या मानसिक नैराश्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र खाकीच्या सजगतेने तिचे प्राण वाचले.

 

टॅग्स :amravati-acअमरावतीrailwayरेल्वेPoliceपोलिसWomenमहिला