चांदूर रेल्वे शहरातून पोलिसांचा रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:54+5:302021-04-22T04:13:54+5:30
चांदूर रेल्वे : शहरातून १९ एप्रिल रोजी दुपारी रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र ...

चांदूर रेल्वे शहरातून पोलिसांचा रूट मार्च
चांदूर रेल्वे : शहरातून १९ एप्रिल रोजी दुपारी रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव व ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात करण्यात आला.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे शहरात रूट मार्च व दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. हा रूट मार्च जुना मोटार स्टँड, सिनेमा चौक, गांधी चौक, क्रांती चौक, अमरावती रोड, विरूळ रोड, रेल्वे स्टेशन परिसर या भागातून काढण्यात आला. याकरिता उपविभागातून दोन अधिकारी, १२ कर्मचारी व एक सैनिक तसेच पोलीस ठाण्याचे चार अधिकारी, ११ अंमलदार व १५ सैनिक याशिवाय आरसीपीचे २२ अंमलदार असे एकूण सहा अधिकारी, ४५ अंमलदार, १६ होमगार्ड हजर होते. या दरम्यान मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, विनाकारण बाहेर येऊन गर्दी करू नये आदी कोरोनासंबंधी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.