दारापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:12 IST2021-04-24T04:12:35+5:302021-04-24T04:12:35+5:30

वाठोडा शुक्लेश्वर : खोलापूर पोलीस ठाण्यांतर्गत दारापूर येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून १ लाख २८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ...

Police raid gambling den in Darapur | दारापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

दारापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

वाठोडा शुक्लेश्वर : खोलापूर पोलीस ठाण्यांतर्गत दारापूर येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून १ लाख २८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ४ आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. संदीप गुणवंत नाईक, पुरुषोत्तम रूपराव वानखडे, गौतम गुणवंत इंगळे, बंडू ऊर्फ बाबूराव गवई, अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपीकडून जुगार साहित्यासह नगदी ४,५६० रुपये, चार मोबाईल, दोन दुचाकी असा एकूण १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध धंदे विरोधात खोलापूरचे पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार मोहीम राबविली.

यावेळी पोलीस जमादार अंबादास पडघामोड, ललित खेडकर, अमर वासनकर, विशाल कौलकर, धनराज मेश्राम सहभागी होते. या कारवाईमुळे खोलापूर पोलीस ठाण्यांतर्गत सर्व गावांमध्ये अवैध धंदेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Police raid gambling den in Darapur