पोलिसांना मिळाले शेख जफरचे ‘लोकेशन’

By Admin | Updated: November 25, 2014 22:47 IST2014-11-25T22:47:41+5:302014-11-25T22:47:41+5:30

रविवारी दुपारी स्थानिक चांदणी चौकात झालेल्या गोळीबार प्रकरणात पसार असलेला मुख्य सुत्रधार शेख जफरचे ‘लोकेशन’ पोलिसांना मिळाले असून या आधारे नागपुरी गेट पोलिसांचे तीन

Police arrests Sheikh Zafar's 'Location' | पोलिसांना मिळाले शेख जफरचे ‘लोकेशन’

पोलिसांना मिळाले शेख जफरचे ‘लोकेशन’

अमरावती : रविवारी दुपारी स्थानिक चांदणी चौकात झालेल्या गोळीबार प्रकरणात पसार असलेला मुख्य सुत्रधार शेख जफरचे ‘लोकेशन’ पोलिसांना मिळाले असून या आधारे नागपुरी गेट पोलिसांचे तीन पथक शोधार्थ रवाना झाले आहेत.
जुन्या वैमनस्यातून रविवारी दुपारी चांदणी चौकात दोन गटात वाद निर्माण झाला आणि भरदिवसा गोळीबार झाल्याची तक्रार नागपुरी गेट पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन्ही गटातील सदस्यांनी परस्परांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपी शेख नईम शेख रहीम (२१), अब्दुल मजीद अब्दुल रशीद (२३), मोहम्मद अहेफाज मोहम्मद एजाज (३४) आणि साबीर खान हमजर खान (३७) या चार जणांना अटक केली होती. सोमवारी चारही आरोपींना न्यायालयाने २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख जफर शेख जब्बार हा घटनेच्या दिवसापासून पसार आहे. त्याचा शोध पोलीस घेत असून पोलिसांना आता त्याचे ‘लोकेशन’ मिळाले आहे. या आधारावर त्याचा शोध घेण्यासाठी नागपुरी गेटचे पोलीस तीन पथक रवाना झाले आहेत.

Web Title: Police arrests Sheikh Zafar's 'Location'