विष प्राशन केलेल्या रुग्णाला वाऱ्यावर सोडले

By Admin | Updated: March 14, 2016 00:02 IST2016-03-14T00:02:12+5:302016-03-14T00:02:12+5:30

विष प्राशन केलेल्या गंभीर अवस्थेतील रूग्णाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने ...

The poisoned patient left the victim on the wind | विष प्राशन केलेल्या रुग्णाला वाऱ्यावर सोडले

विष प्राशन केलेल्या रुग्णाला वाऱ्यावर सोडले

दुर्लक्ष : वैद्यकीय अधिकाऱ्याविरूध्द तक्रार
शेंदूरजनाघाट : विष प्राशन केलेल्या गंभीर अवस्थेतील रूग्णाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने रूग्णाला आरोग्य केंद्राबाहेरच ताटकळत ठेवण्यात आले. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार असलेल्या महिला आरोग्य अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने रूग्णाला दोन तासांनंतर उपचार मिळाले. काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत भाजपचे शहराध्यक्ष सतीश अकर्ते यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. विस्तृत माहितीनुसार, येथील नीळकंठ शेषराव काळे (५४) यांनी विष प्राशन केल्याने १२ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास सतीश अकर्ते यांनी त्यांना गंभीर अवस्थेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी सिरसाम रजेवर होते. त्यांचा प्रभार अर्चना डहाके यांच्याकडे होता. मात्र, त्या आरोग्य केंद्रात उपस्थित नव्हत्या. त्यावेळी केंद्रात फक्त दोन नर्सेस उपस्थित होत्या.
काही वेळ तर विष प्राशन केलेल्या गंभीर अवस्थेतील नीळकंठ काळे यांना रूग्णालयातच घेतले गेले नाही. त्यामुळे सतीश अकर्ते यांनी नगर परिषद सदस्यांना ही ही बाब कळविली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पालिका उपाध्यक्ष जयप्रकाश भोंडेकर, न.प. सदस्य धनराज अकर्ते, देवानंद जोगेकर, ताराचंद सोमकुंवर, नगराध्यक्षांचे पती अरुण खेरडे, संजय बेले आदी आरोग्य केंद्रात पोहोचले. त्यांनी दूरध्वनीवरून प्रभारी वैद्यकीय अधिकारी अर्चना डहाके यांना पीएचसीला येण्याची विनवणी केली. त्यावर त्यांनी रूग्णाला पीएचसीच्या गाडीमध्ये वरूडला रेफर करा, असे उर्मट भाषेत सांगितल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.

घटनेच्या आदल्या दिवशी प्रभारी डॉक्टरांनी रात्रपाळीत काम केले. दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या लवकरच रुग्णालयात आल्या. परंतु दुपारच्यावेळी त्या जेवणासाठी निवासस्थानी गेल्या असता त्यांना एक तास उशीर झाला. यासाठी आम्ही क्षमस्व आहोत.
- अमोल देशमुख,
तालुका वैद्यकीय अधिकारी

Web Title: The poisoned patient left the victim on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.