कवी गिरीश खारकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 20:48 IST2019-10-17T20:24:08+5:302019-10-17T20:48:09+5:30
प्रसिद्ध गजलकार, कवी व कथाकार गिरीश खारकर यांचे हृदयविकाराने निधन झाले.

कवी गिरीश खारकर यांचे निधन
अमरावती : प्रसिद्ध गजलकार, कवी व कथाकार गिरीश खारकर यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य होते. याशिवाय सृजन साहित्य संघाचे जिल्हा कार्याध्यक्षपद, अंकुर साहित्य संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अनेक पुस्तके तसेच राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. फरशी स्टॉप येथील ग्रीन पार्क कॉलनीतील निवासस्थानाहून त्यांची उद्या दुपारी 11 वाजता अंत्ययात्रा निघणार असून, अंत्यविधी 1 वाजता होणार आहे.