खेलो इंडियाची निवड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST2020-12-16T04:30:27+5:302020-12-16T04:30:27+5:30

........... माथाडी कामगारांचा बंदमध्ये सहभाग नाही अमरावती : माथाडी कामगारांच्या राज्य संघटनेने पुकारलेल्या कामबंदला अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत ...

Play India's selection test | खेलो इंडियाची निवड चाचणी

खेलो इंडियाची निवड चाचणी

...........

माथाडी कामगारांचा बंदमध्ये सहभाग नाही

अमरावती : माथाडी कामगारांच्या राज्य संघटनेने पुकारलेल्या कामबंदला अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतिसाद मिळू शकला नाही. बाजार समितीतील सर्व हमालांनी बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला नसल्याने शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सोमवारी सुरळीत पार पडले.

..........

झेडपी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी योग शिबिर

अमरावती : जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, याकरिता सीईओ अमोल येडगे यांनी महिनाभराच्या योगा शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर ८ डिसेंबरपासून सुरू झाले असून, ते आगामी ८ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

..............

आरटीई प्रवेशाची २१ पर्यंत मुदतवाढ

अमरावती : शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई खासगी शाळांत २५ टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीईमध्ये आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढीचा निर्णय झाला असून, २१ डिसेंबरपर्यंत प्रवेशाची संधी देण्यात आली आहे.

...................

झेडपीच्या सभा होणार पूर्वीप्रमाणेच

अमरावती : कोरोना संकटामुळे काही महिन्यांपासून झेडपीच्या ऑनलाईन सभा घेण्यात येत आहेत. आता सभागृहात फिजिकल डिस्टन्स पाळून या सभा पूर्वीप्रमाणेच घेण्यास ग्रामविकास विभागाने मान्यता दिलेली आहे.

....................................

Web Title: Play India's selection test