आडजात वृक्ष कटाईला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:04 IST2018-03-23T22:04:13+5:302018-03-23T22:04:13+5:30
वनविभागाच्या नोंदी आडजात वृक्ष कटाईला मनाई असली तरी वडाळी परिक्षेत्र वगळता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आडजात वृक्षकटाईला उधाण आले आहे.

आडजात वृक्ष कटाईला उधाण
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वनविभागाच्या नोंदी आडजात वृक्ष कटाईला मनाई असली तरी वडाळी परिक्षेत्र वगळता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आडजात वृक्षकटाईला उधाण आले आहे. अवैध वृक्षकटाईला वनाधिकाºयांची मूक संमती असून, परवानगीसाठी मोठी अफरातफर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
परतवाडा, अंजनगाव सूर्जी, लेहगाव, वरूड, मोर्शी, दर्यापूर, चांदूरबाजार आदी परिसरात आडजात वृक्षकटाई मोठ्या प्रमाणात सुरू असून, या भागातील आरागिरण्या लाकडांनी हाऊसफुल्ल आहेत. अकोट, अकोला आणि यवतमाळ मार्गावरून अमरावतीत आडजात लाकूड आणले जात आहे. आडजात वृक्षकटाईचे लाकूड वाहतुकीसाठी आरागिरणी संचालकांनी विशेष वाहनांना प्राधान्य दिले आहे. आडजात वृक्षकटाईला परवानगी नाही, असा निर्णय यापूर्वीच उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी घेतला आहे. मात्र, त्यांच्या अधिनस्थ वनाधिकाऱ्यांनी त्यांना अंधारात ठेऊन आडजात लाकूड वाहतूक राजरोसपणे सुरू केली आहे. हल्ली उन्हाळा प्रारंभ झाला असल्याने आरागिरणीत आडजात लाकूड साठवून ठेण्यासाठी वेग घेतला आहे. अमरावती शहरातही आरागिरण्यांमध्ये अवैध मार्गाने लाकूड आणले जात आहे.
वृक्षांना आगी लावण्याचे प्रकार कधी थांबणार?
आडजात झाडांना आग लावून ते पाडण्याच्या घटना लाकूड ते पाडण्याचा घटना नियमित सुरू आहे. चांदूरबाजार, परतवाडा, अकोट, दर्यापूर मार्गावर वृक्षांच्या बुध्यांशी आग लावून ते खिळखिळे केले जातात. रात्रीच्या वेळी या झाडांचे लाकूड आऱ्यांने कापून लंपास केले जाते. असा प्रकार निरंतर सुरू आहे. याकडे वनाधिकाºयांकडून ठोस कारवाई होत नसल्याची ओरड आहे.
आडजात वृक्षांच्या कटाईला परवानगी नाही. मात्र, शेतकºयांचे निंब, बाभूळ कटाई परवानगीचे अर्ज आल्यास ते शासनाच्या मार्गदर्शनानुसार मंजूर केले जातात. अवैध लाकूड वाहतूक व आरागिरणी तपासणीसाठी धाडसत्र पथक गठित केले आहे.
- एस. झेड. काझी
वनक्षेत्र अधिकारी, वडाळी