राष्ट्रधर्म युवा मंचचे कोंडेश्वर येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:40+5:302021-06-22T04:09:40+5:30
करजगाव : दासटेकडी (गुरुकुंज मोझरी) स्थित राष्ट्रधर्म युवा मंचच्या युवती शाखेच्यावतीने श्रीक्षेत्र कोंडेश्वर येथील खटेश्वर देवस्थानाच्या आवारात १९ जून ...

राष्ट्रधर्म युवा मंचचे कोंडेश्वर येथे वृक्षारोपण
करजगाव : दासटेकडी (गुरुकुंज मोझरी) स्थित राष्ट्रधर्म युवा मंचच्या युवती शाखेच्यावतीने श्रीक्षेत्र कोंडेश्वर येथील खटेश्वर देवस्थानाच्या आवारात १९ जून रोजी वृक्षारोपण पार पडले. आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या संकल्पनेतून विविध भागांत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. प्रवक्ता ईश्वरी अंबाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर वृक्षारोपण अनिता अंबाडकर, सुलोचना पोकळे, भक्ती खंडारे, शकुंतला राजुस्कर, नंदिनी खंडारे, कमल दातीर, रूपराव राजुस्कर, बाळासाहेब खंडारे, सारंग अंबाडकर, पुरुषोत्तम दातीर, ओंकार दातीर तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.