मुलाच्या हत्येचा ठरला होता प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:25 IST2021-02-21T04:25:32+5:302021-02-21T04:25:32+5:30

अमरावती : अपहरण प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखविली नसती, तर चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेहच त्यांच्या हाती पडला असता. अपहरणानंतर सतत ...

The plan was to kill the boy | मुलाच्या हत्येचा ठरला होता प्लॅन

मुलाच्या हत्येचा ठरला होता प्लॅन

अमरावती : अपहरण प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखविली नसती, तर चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेहच त्यांच्या हाती पडला असता. अपहरणानंतर सतत रडत असल्याने या चिमुकल्याला संपविण्याचा अपहरणकर्त्यांचा कट रचला होता, अशी धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

अहमदनगर येथे हिनासह अन्य दोन आरोपींना तपास पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतल्यानंतर तिने आसिफ शेख व फिरोज शेख यांच्या ताब्यात चिमुकला असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. हिनाच्या ताब्यात असताना तो रडला नाही. मात्र, आसिफ शेख व फिरोज शेख यांच्या ताब्यात गेल्यानंतर त्याचे रडणे थांबत नव्हते. रडायचा. आई-वडिलांकडे जाण्याचा हट्ट त्याने धरला. मुलगा रडला, तर पकडले जाऊ, अशी भीती आरोपींना होती. त्यामुळे ‘इस बच्चे को काट देते है’ असे ते आपसात बोलत असल्याचे खुद्द चिमुकल्याने पोलीस पथकासोबत आलेल्या काकांना सांगितले. काकांनी त्याला नेमके काय घडले, ते विचारले तेव्हा त्याने बोबड्या बोलाने ही हकीकत कथन केली.

चिमुकल्याचे बोलणे त्याच्या काकांनी ध्वनिमुद्रित केल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्पष्ट केले. तपासातील विलंब मुलाच्या जिवावार बेतला असता, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: The plan was to kill the boy