-आता गोचिडाच्या जागी खडे, हूक, सूत अन् डाळ-तांदूळ !
By Admin | Updated: December 24, 2014 22:52 IST2014-12-24T22:52:07+5:302014-12-24T22:52:07+5:30
नजीकच्या कोठा फत्तेपूर येथील काजल हटवार या ११ वर्षीय मुलीच्या डोळ्यातून गोचिड निघाल्याची घटना ताजी असतानाच आता तिच्या डोळ्यांमधून आता खडे, हूक आणि डाळ-तांदूळ निघू लागल्याच्या

-आता गोचिडाच्या जागी खडे, हूक, सूत अन् डाळ-तांदूळ !
अंधश्रध्दा : अंनिससमोर पुन्हा नवे आव्हान
वसंत कुळकर्णी - तळेगाव दशासर
नजीकच्या कोठा फत्तेपूर येथील काजल हटवार या ११ वर्षीय मुलीच्या डोळ्यातून गोचिड निघाल्याची घटना ताजी असतानाच आता तिच्या डोळ्यांमधून आता खडे, हूक आणि डाळ-तांदूळ निघू लागल्याच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेच्या या घटनेमुळे अंधश्रध्दा निर्मूलन समितीपुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
काजलच्या उजव्या डोळ्यातून दररोज सकाळी ५ ते १२ या वेळेत ३० ते ३५ रेतीचे खडे, हूक, सूत, डाळ, तांदूळ निघत असल्याने हटवार कुटुंब हतबल झाले आहे. त्यांनी नेत्रतज्ज्ञांकडून औषधोपचार करून घेतल्यानंतरही हा प्रकार सुरूच आहे. काजलच्या डोळ्याचा एक्स-रे सिटी स्कॅनसुध्दा केले. परंतु काहीही निदान झाले नाही. विचित्र प्रकार सुरू असल्याने काजलला डोळ्यांचा त्रास सुरू झाला आहे. या प्रकारानंतर तिला प्रथम अंधूक दिसू लागते, डोळा दुखू लागतो. नंतर डोळ्यात गोचिड ,रेतीचा खडा, हूक, डाळ व तांदळाचा दाणाही फिरताना दिसतो. तो लगेच डोळ्यांतून बाहेर काढावा लागतो. या प्रकारामुळे काजलचे दोन महिन्यांपासून शैक्षणिक नुकसान होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत काजल अव्वल होती. शाळेतील अनुपस्थितीचे कारण शिक्षिकेलाही पटले नाही. परंतु प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटले व त्यांनी काजलला त्रास सुरू असेपर्यंत घरी राहण्याची परवानगी दिली.