गुन्हेगाराकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:04 IST2019-04-15T23:03:45+5:302019-04-15T23:04:02+5:30

अचलपूर येथे ‘पिस्तूल डील’साठी आलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व चारचाकी वाहन असा २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. बुद्धेखाँ चौकात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

Pistols, live cartridges seized from criminals | गुन्हेगाराकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त

गुन्हेगाराकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त

परतवाडा : अचलपूर येथे ‘पिस्तूल डील’साठी आलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व चारचाकी वाहन असा २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. बुद्धेखाँ चौकात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
सल्लू उर्फ सलीम भुरेखाँ नूरखाँ (३४, इंदिरा कॉलनी, बैतूल) या कुख्यात आरोपीविरुद्ध परतवाडा ठाण्यात सात गुन्हे तसेच वर्धा व यवतमाळ ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी दिली. एसडीपीओ पी.जे. आबदागिरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार वानखडे, डीबीप्रमुख पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शेवाळे, रवि बावने, सचिन भोंबे, विशाल थोरात, कृष्णा अस्वार यांनी ही कारवाई केली.

Web Title: Pistols, live cartridges seized from criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.