पिंगळादेवी गड हिरवळीने बहरणार

By Admin | Updated: October 25, 2015 00:17 IST2015-10-25T00:17:58+5:302015-10-25T00:17:58+5:30

येथील पिंगळादेवी गडावर सामाजिक वनीकरण विभाग मोर्शी व साफल्य विद्यालय सावरखेडच्या संयुक्त विद्यमाने विजया दशमीच्या पर्वावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Pingaladevi fort will flourish with greenery | पिंगळादेवी गड हिरवळीने बहरणार

पिंगळादेवी गड हिरवळीने बहरणार

वृक्षारोपण : सामाजिक वनीकरण, साफल्य विद्यालयाचा उपक्रम
नेरपिंगळाई : येथील पिंगळादेवी गडावर सामाजिक वनीकरण विभाग मोर्शी व साफल्य विद्यालय सावरखेडच्या संयुक्त विद्यमाने विजया दशमीच्या पर्वावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संपूर्ण गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवेगार करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी विशाल निंभोरकर, पिंगळादेवी संस्थानचे अध्यक्ष प्रकाश कोठे, व्यवस्थापक संजय कोठे, साफल्य विद्यालयाचे हरित सेनेचे प्रभारी पी.एम. आजनकर, शिरखेड पोेलीस ठाण्याचे रामटेके, आर.बी. मालपे, सुरेश वाकोडे, तुषार घुलक्षे, पंकज भुयार आदी उपस्थित होते.
पिंगळाई देवी दूरदुरपर्यंत परिचित असून गडावर अनेक सामाजिक राजकीय व सार्वजनिक कार्यक्रम वर्षभर होत राहतात. गडावर वृक्ष तयार झाल्यास तेथील सौैंदर्यीकरणात भर पडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल व विदर्भात गडाला एक वेगळे लौकिक प्राप्त होईल. येथे दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांनादेखील याचा लाभ होणार आहे.
कार्यक्रमाला विस्तार अधिकारी हरणे, गोराळा ग्रामपंचयातीचे सचिव कोंडे, माजी. जिल्हा परिषद सदस्य अलका काळे यांनी सदिच्छा भेट दिली. (वार्ताहर)

Web Title: Pingaladevi fort will flourish with greenery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.